पारनेरच्या तीन गावांना टंचाईच्या झळा

पाण्याचे टँकर मंजूर झाल्याची सभापती शेळके यांची माहिती
पारनेरच्या तीन गावांना टंचाईच्या झळा

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यात करोना रुग्णसंख्या वाढत असताना तालुक्यातील काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्या गावांसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून टँकर मंजूर करण्यात आले, असल्याची माहिती सभापती गणेश शेळके यांनी दिली आहे.

तालुक्यात गतवर्षी पाऊस चांगला झाला असल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. मात्र, तालुक्यामध्ये काटाळवेढा, पिंपरी पठार, पिंपळगाव रोठा या तीन गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत होती. त्या गावांचे प्रस्ताव आल्यानंतर हे प्रस्ताव पंचायत समितीच्या माध्यमातून तातडीने प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवले.

यातील पिंपळगाव रोठा गावठाण, खंडोबा वाडी, आदर्श वसाहत, घुले वस्ती व भांबरे वस्ती यासाठी अकरा हजार लिटर पाण्याची एक खेप, पिंपरी पठार गावासाठी गावठाण व शिंदे वस्ती याठिकाणी आठ हजार लिटर पाणी एक खेप तर कातळवेढा गावासाठी गावठाण, डोंगरवाडी चारणवाडी, दत्तवाडी, गव्हाणेवस्ती, घटाटे वस्ती यासाठी एकूण 30 हजार लिटर पाणी म्हणजे एकूण तीन खेपा मंजूर झालेल्या आहेत. आणखी काही गावांचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. ते प्रस्ताव लवकरच परिपूर्ण करून प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवले जातील आणि लवकरात लवकर टँकर मंजूर केले जातील अशी माहिती सभापती शेळके यांनी दिली.

तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने अनेक भागांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली नाही. परंतु ज्या भागातून टँकर मागणीसाठी प्रस्ताव आले आहेत. त्यांचा प्राधान्यक्रमाने विचार करून मंजूर करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. येथील ग्रामपंचायतीने त्वरित प्रस्ताव सादर करावेत ते प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

- गणेश शेळके, सभापती पारनेर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com