
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
पारनेर (Parner) तालुक्यात रविवारी ही सायंकाळी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. यात कमी जास्त प्रमाण असले तरी अनेक ठिकाणी शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पारनेर (Parner) तालुक्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. शुक्रवारी पारनेर (Parner) तालुक्याच्या पश्चिम उत्तर भागाला पावसाने जोरदार तडाखा दिला. यात अनेक ठिकाणी शेतमालाचे भाजीपाला पिके व फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी शेतकर्यांना कांदा झाकपाक करताना नाके नऊ आले. शनिवारी रात्री ही तालुक्यातील अनेक गावांनी रात्री दहा नंतर पावसाने हजेरी लावली . तर रविवारी सायंकाळी पाच नंतर तालुक्यातील अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतमालाचे मोठे नुकसान झाले.
तालुक्यातील वनकुटे (Vankute) गावात रविवारी सायंकाळी जोरदार गारांसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे मोठा प्रमाणात झाडे, घरांचे पत्रे, विजेचे पोल याचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाची सर्वाधिक झळ शेतकर्यांना बसली असुन यात वारा व गारपिटामुळे आंबा, द्राक्षे, कलिंगड, खरबुज या फळ पिकांचे मोठे नुकसान (Crops Loss) झाले आहे.
तर कांदा, गहू या पिकांबरोबरच जनावराचा चारा पिकेही भुई सपाट झाली आहेत. पारनेर तालुक्यात वांगे, टमाटो, गवार, भेंडी, मेथी, कोंथबीर या भाजीपाला पिकाची पुणे मुंबईला मोठ्या प्रमाणात निर्यात होते. परंतु गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आजुनही दोन दिवस पाऊस असल्याने शेतकर्यांचा जीव टांगणीला लागला आहे.