पारनेर तुलक्यात युरियाचा कृत्रीम तुटवडा

कृषी विभागाकडून कारवाईची अपेक्षा
File Photo
File Photo

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासुन युरीया खताचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे पिकांना खेते देण्याच्या ऐनवेळी खाताचा तुटवडा जाणवत आसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत हा तुटवडा कृत्रीम असल्याने साठा करणार्‍या कृषी केंद्रावर कारवाईची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

साधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये रब्बीच्या पेरण्या झाल्या असून पिक उगवणीनंतर शेतातील ज्वारी, कांदा, गव्हासह इतर पिकांना पाणी खतांचा डोस दिला जातो. या काळात पिकाच्या खुरपण्या करुन खताच्या ढोसासह पाणी देणे गरजेचे आसताना पारनेर तालुक्यातील अनेक भागात युरया खताचा तुटवडा जाणवू लागला आहे. शेतकरी प्रत्येक कृषी केंद्र तसेच खत विक्री करणार्‍या दुकानांमध्ये चौकशी करत फिरताना दिसत आहेत. ज्या ठिकाणी थोडेफार खत उपलब्ध असल्याची माहिती मिळताच तेथे एकच झुंबड होत आहे.

याबाबत खत विक्रेत्यांना विचारले असता, मागील आठवड्यात रँक आल्या होत्या. नियमित रँक येत नसल्याने व सध्या सर्वांना युरीयाची आवश्यकता आसल्याने खताचा तुटवडा भासत आहे. तर काही शेतकर्‍यांचे म्हणने आहे की, पंधरा वीस दिवसापासुन दुकानांमध्ये युरीया मिळत नाही. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात युरीयाची जास्तीतजास्त गरज भासत आसताना कृषी विभाग या काळासाठी युरीयाचा भंपर स्टाँक करते.

परंतु यंदा तसा साठा नसल्याचे चित्र आहे. नेमका याचाच गैरफायदा घेत खत विक्रेत्यांकडून या काळात युरीयाचा कृत्रीम तुटवडा निर्माण करून गुपचूप चढ्या दराने खताची विक्री केली जात असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. कृषी विभागाने खत विक्रेत्यांची चौकशी करून साठा करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

चौकशीची मागणी

नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातच युरीयाचा तुटवडा का निर्माण होतो? की जाणुनबुजुन तुटवडा निर्माण केला जातो?. यात व्यापारी दुकानदार हात राखतात? की अधिकारी हालगर्जीपणा करतात? या सर्वाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com