भोयरे गांगर्डा ते रूईछत्रपती रस्त्यालगत झाडांना लावली आग; शेकडो झाडे होरपळली

सामाजिक वनीकरणाचे लाखो रुपये पाण्यात | संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
भोयरे गांगर्डा ते रूईछत्रपती रस्त्यालगत झाडांना लावली आग; शेकडो झाडे होरपळली

पारनेर | तालुका प्रतिनिधी

पारनेर (Parner) तालुक्यातील भोयरे गांगर्डा ते रूईछत्रपती (Bhoyare Gangarda-Ruichhatrapati road) फाटा लगत असलेल्या झाडांना (tree) आग (fire) लावल्याने शेकडो झाडे होरपळली असून झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. आग लावणार्‍या संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केले जात आहे.

गेली सहा वर्षांपूर्वी भोयरे गांगर्डा ते रूईछत्रपती फाटा या दरम्यान सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. यावर ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली मजूर लावण्यात आले. तीन वर्ष मुदतीत असलेल्या या मजूरांकडून दुतर्फा झाडांची साफ सफाई करणे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जनावरे येऊ न देणे तसेच झाडांना वेळेवर पाणी घालणे आदी कामे ठरवून देण्यात आली. याबाबत दैनिक सार्वमतने देखील वेळोवेळी आवाज उठवून सामाजिक वनीकरणाला जाग आणली.

सुमारे तीन वर्षांच्या या कालावधीत झाडांची वाढ देखील चांगल्या प्रकारे झाली. या झाडांसाठी सामाजिक वनीकरणाने सुमारे वीस ते बावीस लाख रुपये खर्च केले. मात्र रस्त्यालगत असणार्‍या शेतजमीन मालकांकडून झाडांना आग लागली जात असल्याने झाडांची मोठी हानी होत आहे. यावर ना सामाजिक वनीकरणाचे लक्ष ना ग्रामपंचायतीचे ना पीडब्लूडीचे, झाडांना आग लावणार्‍या जागा मालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.

दर वर्षी रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक निघाल्यानंतर शेतीची मशागत सुरू होते. या दरम्यान शेतकरी आपल्या शेतात खत टाकणे, नांगरणी करणे आदी कामे करतात. या दरम्यान शेताच्या कडेला असलेल्या ताली पेटवून देतात. मात्र याताली पेटवून दिल्याने पशू पक्षी व लाखो रुपयांची झाडे त्यात होरपळून निघत आहे. सुमारे तीन वर्षे पाणी घालून हे झाडे क्षणात नष्ट होत असल्याने शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च केलेला पाण्यात जात असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

रस्त्यालगत असणार्‍या शेतकर्‍यांनी झाडे पेटवून देणे हा गुन्हा आहे. याबात ग्रामपंचायत अथवा पीडब्लूडीने कळवायला पाहिजे. यासाठी आम्ही नवीन उपक्रम हाती घेतला आहे. जसे की रस्त्याच्या कडेला जांभूळ, आवळा, चिंच, आंबे आदींसह इतर फळझाडे साठ टक्के लावणार आहोत. इतर चाळीस टक्के झाडे लावणार आहोत. जेणेकरून शेतकर्‍यांना याचा फायदा होईल व शेतकरी त्याची निगा राखतील.

- वैशाली भालावी, रेंज फॉरेस्ट ऑफिसर पारनेर

Related Stories

No stories found.