परतीच्या पावसाने झोडपले, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

परतीच्या पावसाने झोडपले, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

भाळवणी l प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील वाघवाडी (ढवळपुरी) परिसरात शुक्रवारी सायंकाळी गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.

काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेक शेतकऱ्यांचे ऊस, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

त्याचप्रमाणे जामगाव परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने याठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. या परतीच्या पावसाने काही ठिकाणी नुकसान झाली असली तरी अद्याप भाळवणी परिसरातील काही गावांमध्ये मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

Related Stories

No stories found.