दोन दिवसांपासून बेपत्ता 'त्या' युवा उद्योजकाचा मृतदेह सापडला

दोन दिवसांपासून बेपत्ता 'त्या' युवा उद्योजकाचा मृतदेह सापडला

पारनेर | तालुका प्रतिनिधी

शिरुर (Shirur) येथील युवा व्यावसायिक (young entrepreneur) आदित्य चोपडा गेल्या दोन-तीन दिवसापासुन बेपत्ता होते. बुधवारी दुपारी त्याच्या मृतदेह (Dead Body) नारायणगव्हाण (NarayanGavhan) येथील महामार्गालगतच्या विहिरीत आढळून आला आहे.

याबाबत सुपा पोलिसांनी (Supa Police) दिलेल्या माहितीनुसार, मुळ कडूस ता.पारनेर येथील रहिवाशी असलेले चोपडा परिवार व्यावसायानिमित शिरुर (घोडनदी) जि. पुणे येथे स्थायिक झालेला आहे. या परिवारातील युवा उद्योजक आदित्य चोपडा गेल्या दोन दिवसापासुन बेपत्ता असल्याची फिर्याद कुटुंबियांनी सुपा पोलिस स्टेशनला केली होती.

सुपा पोलिसांनी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंदवून तपास चालू केला होता. बुधवार दि .२९ सप्टेंबर २०२१ रोजी काही तरुण बबन धोंडीबा नवले यांच्या विहरीजवळ गेले असता तेथे एक मृतदेह आढळून आल्याचे त्याच्या लक्ष्यात आले. त्यांनी तात्काळ ही माहिती जवळील नागरिकांना व सुपा पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवली असता मृतदेह चोपडा याचा असल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत तात्काळ नातेवाईकांना कळवण्यात आले. मृत व्यक्तीच्या नातेवाईक तेथे आल्यावर त्यांनी आक्रोश करत अहमदनगर पुणे महामार्गावर नवले मळा येथे रास्ता रोको अंदोलन केले. मृताचे नातेवाईक व जमा झालेल्या नातेवाईकामुळे महामार्ग बंद होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सुपा पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात रवाना केला. उशीरा पर्यत गुन्हा नोंदवन्याचे काम चालु होते , तर पीएम रिपोर्ट वरुन पुढील तपासाची दिशा ठरवली जाईल असेही पोलिसांनी सांगितले.

व्यवसायाने ठेकेदार आसलेल्या आदित्य चोपडाचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात एकच खळवळ उडाली असून हत्या की आत्महत्या? अशा दोनही बाजुने पोलिस तपास करत आहेत .

Related Stories

No stories found.