बदलीनंतर देवरेंमागे तक्रारीची पीडा

लाचलुचपतकडे चौकशीसाठी तक्रार
बदलीनंतर देवरेंमागे तक्रारीची पीडा

पारनेर / अहमदनगर (प्रतिनिधी)

आ.निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांच्या त्रासाला कंटाळून आपणास आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही, असा ऑडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या पारनेरच्या तहसीलदार (Parner Tehsildar) ज्योती देवरे (Jyoti Devre) यांची विभागीय चौकशीत दोषी आढळल्यानंतर तडकाफडकी जळगाव (Jalgoan) येथे बदली करण्यात आली. आता देवरे यांनी उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा करत केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी (Corruption inquiry) करण्याची मागणी लाचपलुचपत विभागाकडे (anti corruption bureau) करण्यात आली आहे.

राज्याच्या सहसचिवांनी बुधवारी तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Devre) यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत देवरे यांनी गंभीर स्वरूपाच्या अनियमितता केल्याचे तसेच अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन पदाचा दुरूपयोग केल्याचे आढळून आले. त्यांच्यावर ठपका ठेवून कारवाई करण्याचा अहवाल शासनास पाठवण्यात आला होता. त्यानुसार त्यांना दोषी ठरवत महाराष्ट्र शासकीय बदल्यांचे अधिनियम आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील कलम ४ (५) नुसार सार्वजलिक सेवेच्या हितार्थ त्यांची तडकाफडकी जळगाव येथे बदली करण्यात आली.

आता त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (anti corruption bureau) तक्रार करण्यात आली आहे. कारभारी भाऊसाहेब पोटघन यांनी अॅड असीम सरोदे यांच्यामार्फत ही तक्रार केली. यावेळी अॅड. सरोदे म्हणाले, देवरे यांनी पदाचा गैरवापर करत भ्रष्टाचार केल्याचा आरोप सातत्याने होत आहे. यात अनेकजण सहभागी असण्याची शक्यता आहे, अशी तक्रार पोटघन यांनी केल्याचे त्यांनी सांगीत

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com