पारनेर तालुक्यात एसटी बस वाढवण्याची मागणी

पास मिळत नसल्याने पालकांना भुर्दंड
पारनेर तालुक्यात एसटी बस वाढवण्याची मागणी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सध्या शाळा चालू नाही असे कारण देत तालुक्यात एसटी बसेसच्या फेर्‍या आल्प प्रमाणात सुरू आहेत त्यामुळे विविध परीक्षा, प्राक्टिकलस तसेच प्रवेश परीक्षांच्या वर्गांना जाणार्‍या विद्यार्थीचे मोठे हाल होत आहे. तर अशी विर्द्यांना मासिक पासही दिले जात नसल्याचे पालकाना रोज मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे .पारनेर बस डेपोच्या वतीने एस टी बसेसच्या फेर्‍या वाढवाव्यात अशी विद्यार्थी व पालकाची मागणी आहे .

नोव्हेंबर पासुन एस टी कर्मचार्‍यांचा संप चालू होता तेव्हा एस टी बसेस शंभर टक्के बंद होत्या त्या काळात विद्यार्थी पालकाचे अतोनात हाल झाले. त्यानंतर संप मिटला तर शाळाना सुट्टी म्हणून महामंडाळ बस फेर्‍या बंद केल्या. शाळाना सुट्या आसल्या तरी विद्यार्थीचे विविध वर्ग चालू आहेत. पंरतु महामंडळाचे अधिकारी नियमावर बोट ठेवून पळवाटा शोधत आहेत. अनेक मार्गावरील बस बंद केल्या ओहत.

ज्या काही थोड्याफार मार्गावर बस चालू आहेत .तेथे विद्यार्थी ये जा करत आहे तर तेथे विद्यार्थांना पास दिले जात नाहीत. यासाठी शाळांना सुट्या असल्याचे कारण दिले जात आहे. सुपा पारनेर मार्गासह तालुक्यात इतर ठिकाणचे रोज शेकडो विद्यार्थी एसटी बस ची प्रतिक्षा करत रस्त्यावर उभे दिसत आहेत. ना बस चालु ना सवलतीचा पास दिला जात आहे. यात विद्यार्थी व पालकांचे मोठे हाल होत आहेत.

महामंडळाचे कालबाह्य नियम

एस टी महामंडळ विद्यार्थ्यांना शाळांसाठी सवलतीच्या दरात पास देतात. शाळे व्यतिरिक्त जुन्या नियमाप्रमाणे टायपिंग क्लासला पास देत आहेत. परंतु संगणक प्रशिक्षणासह अधुनिक शिक्षणाला मात्र पास दिले जात नाहीत. तर टायपिंग प्रशिक्षण कालबाह्य होऊन अनेक वर्षे झाली आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com