पारनेर तालुक्यातील शाळा रोड मॉडेल करणार - आ. लंके

पारनेर तालुक्यातील शाळा रोड मॉडेल करणार - आ. लंके

पारनेर |प्रतिनिधी| Parner

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या बालमनावर शैक्षणिक संस्काराबरोबर संस्कार मूल्ये रुजवणे गरजेचे असून या शाळेतील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन पारनेर तालुक्यातील प्राथमिक शाळा राज्यासाठी रोल मॉडेल करणार असल्याची ग्वाही आ. निलेश लंके यांनी शिक्षण परिषदेमध्ये दिली आहे.

पारनेर पंचायत समितीच्या शिक्षण विभाग व निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने पारनेर येथे एक दिवशीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जि.प.चे शिक्षणाधिकारी पाटील, गटविकास अधिकारी किशोर माने, गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब घुगे, नगरचे गट शिक्षणाधिकारी रवींद्र कापरे ,तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्यासह तालुक्यातील अनेक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी व शिक्षक उपस्थित होते. या शिक्षण परिषदे दरम्यान धोत्रे बुद्रुक, पिंपळगाव कौंडा, पिंपरी अशील या प्राथमिक शाळांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण करण्यात शिक्षकांनी केले.

तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, वाबळेवाडी शाळेतील गोरख काळे तर जातेगाव, मकई येथील विजय गोडसे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी हंगा गावचे उपसरपंच सचिन साठे शिवाजी शिंदे यांच्यासह इंजिनियर सतीश भालेकर व शिक्षक नेते चंद्रकांत मोढवे यांनी परिश्रम घेतले.

जि.प.शाळांच्या विकासासाठी चारसुत्री कार्यक्रम

- विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी सर्व शाळा डिजीटल, स्मार्ट बनविणे.

- सर्व स्पर्धा परीक्षांसाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करणे.

- आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे भौतिक सोई-सुविधा उपलब्ध करुन देणे

- विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मूल्यशिक्षण, खेळ, कालागुणांना वाव देणे.

Related Stories

No stories found.