
सुपा |वार्ताहर| Supa
पारनेर तालुक्यात (Parner Taluka) गुरुवारी 16 परीक्षा केंद्रावर (Examination Center) पाचवी 1 हजार 895 पैकी 1 हजार 634 विद्यार्थ्यांनी तर आठवीच्या 1 हजार 90 पैकी 959 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा (Scholarship examination) दिली. 392 विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली. तालुक्यात 2 हजार 985 पैकी 2 हजार 593 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
करोनामुळे (Covid 19 Problem) मागील वर्षी पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship examination) पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे लाखो विद्यार्थी-पालक संभ्रमात होते. मात्र, अनेकवेळा तारखा बदलल्यानंतर काल तालुक्यात 16 केंद्रांवर शिष्यवृत्तीची परीक्षा झाली. दरवर्षी उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीच्या दुसर्या किंवा तिसर्या रविवारी घेण्यात येते. परंतु, करोनामुळे या परीक्षेचे नियोजन कोलमडले होते.
दरवर्षी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Upper Primary Scholarship Examination) व इयत्ता आठवीसाठी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी ही परीक्षा घेण्यात येते. शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. पारनेर तालुक्यातील (Parner Taluka) इयत्ता पाचवी जिल्हा परिषदेचे 933 विद्यार्थी हायस्कूलचे 967 विद्यार्थी, आठवीचे जिल्हा परिषदचे 19 विद्यार्थी, माध्यमिकचे 1 हजार 74 विद्यार्थी असे तालुक्यातून 2 हजार 985 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
ऑनलाईन शिक्षणाचे खरे स्वरुप स्पष्ट होणार !
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाद्वारे नियंत्रित असणार्या या परीक्षेद्वारे ऑनलाईन शिक्षणाचे खरे स्वरुप स्पष्ट होणार आहे.शाळांमध्ये शिक्षकांनी मेहनत घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. करोनात शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेतलेला आहे. त्यामुळे अनेक शाळांतील विद्यार्थी परीक्षेची उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर काल परीक्षा पार पडली असल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकांत आनंदाचे वातावरण आहे.