पारनेर तालुक्यात चोवीस तासात 52 मी.मी. पाऊस

मांडओहळ धरण ओव्हरफ्लो || विज पडून गाय ठार
पारनेर तालुक्यात चोवीस तासात 52 मी.मी. पाऊस

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यात बुधवारी सकाळी ते गुरुवारी सकाळी आठ या चोवीस तासात मुसळधार पाऊस झाला असून शासनदरबारी याची 52 मिली मिटर नोंद झाली आहे. या पावसाने तालुक्यातील ऐकमेव धरण आसलेले मांडओहळ धरण ओहरफ्लो झाले असुन बुधवारी रात्रभर झालेल्या पावसाने धरणातुन मोठा विसर्ग होत आहे. तर पळवे येथे विज पडून गायीचा मृत्यु झाला.

पारनेर तालुक्यात चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाला असुन आज अखेर पावसाने सरासरी ओलांडली असुन शेतीला पुरक वातावरण बनले आहे. अनेक शेतकर्‍यांच्या शेतामध्ये पाणी साचले आहे. मात्र नुकसानीबाबात अद्याप तक्रारी आल्या नसल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांनी दिली. तालुक्यातील अनेक नाले तलाव तुडूंब भरले आहे. तर बुधवारी सांयकाळी चालू झालेला पाऊस रात्रभर चालू होता. गुरुवारी सकाळ पर्यत संततधार चालू होती. पळवे बुद्रुक येथील शरद आनंदा चौधरी यांच्या गायीवर विज पडल्याने गायीचा मृत्यू झाला.

बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मांडओहोळ धरणाच्या सांडव्यातून प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे. त्यामुळे नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकर्‍यांच्या विद्युत वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत. विद्युत खांब तसेत रोहित्रांचे नुकसान झाल्याने खडकवाडी, मांडवे खुर्द परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात कुकडी नदीला पूर आला आहे.

मांडवे खुर्द- देसवडे रस्त्यावरील तसेच अळकुटी चभूत रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने परिसरातील संबंधित गावांचा संपर्क सकाळपर्यंत तुटलेला होता. नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना महसूल व पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत.

तालुक्यात सर्वदुर समाधानकारक पाऊस झाला असुन बुधवारी रात्रभर झालेल्या पावसाने अद्याप आर्थिक हानी झाल्याची माहिती हाती आली नाही, पावसाचे दिवस डोळ्यासमोर ठेवून संबधीत यंत्रनांना आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत. नदीकाठच्या शेतकर्‍यांनी दक्षता घ्यावी.

- तहसिलदार अवळकंठे, पारनेर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com