पारनेर तालुक्यात सरासरीपेक्षा 40 टक्के कमी पाऊस

तलाव, विहिरी कोरडे, बळीराजा चिंतेत
पारनेर तालुक्यात सरासरीपेक्षा 40 टक्के कमी पाऊस

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

देशभरात पावसाळा अखेरच्या टप्प्यात पोहचला असला तरी पारनेर तालुक्यात (Parner Taluka) आतापर्यंत सरासरी 87.3 मीली मी. इतका कमी पाऊस (Rain) झाला आहे. हा सरासरीच्या 40 टक्केने कमी आहे. यातील अधिक पाऊस अतिवृष्टीस्वरूपात (Heavy Rain) केवळ काही गावांत झाला आहे. परिणामी तालुक्यातील बहूतांश तलाव (Pond), नद्या (River), विहिरी कोरड्या (Well) आहेत. शेवटच्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास अगामी वर्ष दुष्काळाच्या झळात जाण्याची शक्यता असल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतेत आहे.

पारनेर तालुका नैसर्गिक कमी पर्जन्यमानाच्या (Parner taluka Natural low rainfall) क्षेत्रात येतो. यामुळे दुष्काळी (Drought) म्हणून गणला जातो, तालुक्याच्या दोन्ही बाजुनी कुकडी (Kukadi) व मुळा (Mula) आशा नद्या (River) वाहत आहेत परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व दूरद़ृष्टी नसल्यामुळे त्या नद्यांचा म्हणावा तसा वापर तालुक्यासाठी झालेला नाही. कुकडी कॅनॉल (Kukadi Canal) व मुळा व कुकडी नद्यांच्या (Mula And Kukadi River) काठालगतचा तालुक्यातील काही भाग ओलिताखाली आला आहे ,बाकी तालुक्यातील इतर शेती नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी बिगरमोसमी पाऊस पडतो व जून महिन्यात मोसमी पाऊस पडतो .चालू वर्षी पारनेर तालुक्यात मे,जून महिन्यात साधारणपणे बरा पाऊस पडला परंतु त्यानंतर अगदी 15 सप्टेंबरपर्यंत मोठा व पाणी साठेल असा पाऊसच झाला नाही. यात तालुक्याच्या उत्तर - पूर्व भागातील काही गावांत अनपेक्षित अतिवृष्टी झाली. तालुक्यातील इतर गावे मात्र पावसाच्या प्रतिक्षेतच आहेत. त्यामुळे गावोगावचे नाले, ओढे, लहानमोठे तलाव, विहिरी कोरड्याच आहेत. रिमझीम पावसावर खरिपाची पिके जेमतेम आली परंतु रब्बी हंगामासाठी मोठा पाऊस नसल्यामुळे ज्वारीच्या पेरण्या लांबल्या आहेत, तर जल स्रोतानी पाणी साठले नसल्यामुळे इतर पिकेही धोक्यात आली आहेत.

याबाबत तालुका कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीत म्हटले आहे 13 सप्टेंबर अखेर पारनेर तालुक्यात सरासरी 87.3 मिली मिटर पर्जन्यमान झाले म्हणजे 61.3 % टक्के पाऊस झाला असून तालुक्यातील ढवळपुरी पळशी वनकुटे कान्हुरपठार या काही गावानी चांगला पाऊस झाला असून बाकी तालुक्यात सरासरीपेक्षा 40 % पाऊस कमी झाला आहे , त्यामुळे ज्वारी पिकाच्या पेरण्या लांबल्या आहेत, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.

शेतकर्‍यांच्या नजरा आभाळाकडे

पावसाचे प्रमाण कमी व पाणवठ्यांनी पाणी नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह भाजीपाला , फळे व फुले पिके धोक्यात आली आहेत. काही ठिकाणी तर कांदा लागवडही थांबली आहे. सप्टेंबर महिना अर्धा संपला म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पानकळा संपला तरी आवश्यक पाऊस झाला नसल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पावसाची बरीच नक्षत्र संपत आली आहेत. तर राहिलेल्या नक्षत्रात पाऊस पडावा म्हणून बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागून राहिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com