
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
तालुक्यात 16 ग्रांमपचायतीच्या सरपंच व सदस्य निवडणुक प्रक्रियेमध्ये आज 39 हजार 679 मतदारापैंकी 34 हजार 206 मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला असुन सरासरी 88.22 टक्के मतदान झाले. भाळवणी येथे एक तास ईव्हीएम मशीन बंद झाल्याचा प्रकार घडला. इतर किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.
पारनेर तालुक्यातील 16 ग्रांमपचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी रविवारी (दि.18) सकाळी मतदानाला सुरवात झाली. सर्व गावांमध्ये सकाळपासून मतदाराचा चांगला प्रतिसाद दिसत होता. कार्यकर्ते अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठी धावपळ करत होते. पहिल्या तीन तासातच 33 टक्के टक्कापेक्षा जास्त मतदान झाले. जास्तीतजास्त घडून आणण्यासाठी कार्यकर्ते मोठी धावपळ करताना दिसत होते. भाळवणी येथे एका बुथवर मशीन बंद पडल्याने एक दिडतास वाय गेला त्यानंतर त्या बुधवर मतदाराची रांग दिसत होती. तर पळशी येथे बोगस मतदाना वरुण थोडा संघर्ष झाल्याचे वृत्त हाती आले असुन गोरेगाव मध्ये किरकोळ प्रकार घडला.
झालेल्या मतदानामध्ये भोंद्रे येथे - 477, पिंपळगाव तुर्क - 681, पळशी - 3201, वनकुटे - 3116 , करंदी - 1380, हत्तलखिंडी - 682, पुणेवाडी - 2291, सिद्धेश्वरवाडी - 1256, भाळवणी - 3712, ढवळपुरी - 5721, पाडळी तर्फे कान्हुर - 1432, गोरेगाव - 3477, चोंभूत - 1463, गुणोरे - 1940, मस्केवाडी - 1340, व कोहकडी - 2037 असे मतदान झाले.