पारनेर तालुक्यात 40 गावांत एक गाव एक गणपती

73 गणेश मंडळांना उत्सवासाठी परवानगी
पारनेर तालुक्यात 40 गावांत एक गाव एक गणपती

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यात 130 गावे असुन सुपा व पारनेर पोलिस स्टेशन या दोन पोलिस स्टेशन हद्दीत 73 मंडळानी अधिकृत गणेश उत्सवाची परवानगी घेतली असुन 40 गावात एक गाव एक गणपती योजना आमलात आली असल्याची माहिती पोलीसांनी दिली. आज उत्साहात तालुकाभरात गणेश मंडळे तसेच घरोघरील गणेशांची प्रतिष्ठापणा झाली.

गणेश स्थपनेचा दिवसा आसल्याने पारनेर सुपा निघोज आळकुटी टाकळी कान्हुर भाळवणी आदी मोठाल्या गावानी बाजारपेठा फुलल्या होत्या. सुपा पारनेर येथे तर गणेश मुर्ती सजावट साहित्य फळे पाने फुले प्रसादाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकाची झुबड उडाली होती. बाजारात सर्वच वस्तुचे दर वाढलेले दिसत होते. यात प्लास्टर ऑफ प्यारीसचे वाढलेले दर, वाढती मजुरी, कच्च्या मालाचे वाढलेले दर यामुळे बप्पाच्या मुर्ती 30 ते 40 टक्क्यांनी वाढलेले आहेत. तर पुजेचे साहित्याच्याही किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दोन वर्षाच्या कालखंडानंतर सण उत्सव साजरा होत आसल्याने वाढत्या किंमतीचा नागरीकांवर कुठलाच परिणाम दिसत नव्हता.

तालुक्यात अनेक मंडळानी विधायक कामाना प्राधान्य दिले आहे तर काही मंडळानी आकर्षक देखावे विद्युत रोषणाई केलेली दिसत आहे. गणेशा बरोबर दोन दिवसांनी गौराईचेही आगमन होणार आसल्याने महिला वर्गही खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात दिसत होता. एंकदरीतच दोन वर्षीच्या कालखंडानंतर गौरी गाणपतीचा उत्साह सार्वजनिक स्वरुपात साजरा होत आसल्याने नागरीकाच्यात मोठा उत्साह जानवत होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com