पारनेर तालुक्यात करोना आकड्यात वाढ

प्रशासनाची चिंताही वाढली
पारनेर तालुक्यात करोना आकड्यात वाढ

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यात करोना बाधितांचा आकडा वाढत असल्याचे प्रशासनाची चिंता वाढत आहे . आरोग्य विभाग पुढील तयारीला लागल्याची माहिती आरोेग्य अधिकार्‍यांनी दिली.

पारनेर तालुक्याला करोनाने दोन्ही लाटेत मोठे तडाखे दिले आहेत. तर डिसेंबर 2021 महिन्यात तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात अचानक करोनाचा उद्रेक होऊन 90 पेक्षा जास्त विद्यार्थी व शिक्षक व कर्मचारी बाधित झाले होते.सगळीकडे शांतता असताना अचानक नवोदय विद्यालयात करोनाचा विस्फोट झाल्याने जिल्हा खडबडून जागा झाला. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांच्या व कर्मचार्‍यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. दैव बलवत्तर म्हणून सर्व विद्यार्थी सुखरूप घरी गेले.

जानेवारी 2022 पासून पारनेर तालुक्यात दिवसागणीक करोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. सरकारी आकडेवारीप्रमाणे हे आकडे दुहेरी संख्येत दिसत असले तरी दिवसागणीक त्यात वाढच होत आहे . बाधितांची रोज होणारी वाढ ही चिंतेची बाब असून यात पुढील धोके दिसू लागले आहेत . आरोग्य विभागाने जनतेला सुरक्षित राहण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे .पारनेर तालुक्यात रोजच्या तपासणी अहवालात बाधितांचा आकडा रोज वाढतच आहे . यात गेल्या चार पाच दिवसांपासून वाढ होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com