पारनेर तहसीलदार देवरे यांची बदली

पारनेर तहसीलदार देवरे यांची बदली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेर तहसीलदार ज्योती देवरे (Parner Tahsildar Jyoti Devare) यांची बदली (Transfer) करण्यात आली असून त्यांना तत्काळ, 14 सप्टेंबर रोजी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

जळगाव (Jalgav) येथे संजय गांधी योजनेत (Sanjay Gandhi Yojana) त्यांच्या बदलीचे आदेश (Transfer Order) शासनाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांनी काढले आहेत. शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 मधील कलम 4(5) नुसार प्रशासकीय कारणात्सव बदली करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. जिल्ह्याधिकार्‍यांच्या अहवालानुसार देवरे (Jyoti Devare) यांनी गंभीर स्वरूपाच्या अनियमितता केल्याचे आदेशात नमुद आहे.

आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांच्याशी झालेल्या वादानंतर ज्योती देवरे (Jyoti Devare) चर्चेत आल्या होत्या. त्यांची आत्महत्येच्या विचारासंदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांंनी स्थानिक आमदारांवर अनेक गंभीर आरोप केले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com