एकतर देवरेंची अथवा आमची बदली करा !

पारनेर तहसीलच्या 41 कर्मचार्‍यांचा 25 तारखेपासून आंदोलनाचा इशारा
एकतर देवरेंची अथवा आमची बदली करा !

पारनेर |प्रतिनिधी|Parner

आ. निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांच्याविरोधात तक्रार करणार्‍या तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांच्या विरोधातील चौकशी अहवाल उजेडात आल्यानंतर अडचणीत सापडलेल्या देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे. तहसील कार्यालयातील 41 कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्री (CM), उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister), महसूलमंत्री (Minister of Revenue) यांच्यासह सर्व संबंधितांना निवेदन पाठवून एक तर आमची तालुक्याबाहेर बदली करा किंवा देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांची पारनेरहून बदली (Parner Transfer) करा, अशी मागणी केली आहे. मागणीचा विचार न झाल्यास 25 ऑगस्टपासून (August) बेमुदत काम बंद आंदोलन (Movement) सुरू करण्याचा इशारा (Hint) दिला आहे.

तहसीलदार देवरे (Tahsildar Jyoti Devare) या पारनेर (Parner) येथे रूजू झाल्यानंतर त्यांच्यात तसेच कर्मचार्‍यांमध्ये संघर्ष सुरू झाला होता. त्याविरोधात कर्मचार्‍यांनी तक्रार केल्यानंतर प्रांताधिकारी सुधाकर भोसले (Sudhakar Bhosale) तसेच आ. लंके (MLA Nilesh Lanke) यांनी करोेना स्थितीमुळे प्रशासनावर ताण आहे. कर्मचार्‍यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरही देवरे यांचा त्रास सुरूच राहिल्याने कर्मचार्‍यांमधील संताप पुन्हा उफाळून आला आहे. देवरे (Tahsildar Jyoti Devare) या राजकियदृष्ट्या सक्रिय असल्यासारख्या वागतात. त्यामुळे खालच्या कर्मचार्‍यांना त्याच्या बर्‍यावाईट परिणामांना तोंड द्यावे लागते.

देवरे (Tahsildar Jyoti Devare) या कर्मचार्‍यांना वेळोवेळी धमक्याही देतात. त्यामुळे सर्व 41 कर्मचारी पारनेर (Parner) तालुक्यात काम करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. या गोष्टीचा विचार करून एकतर आम्ही सर्व कर्मचार्‍यांची तालुक्यातून बदली करावी किंवा तहसीलदार देवरे (Tahsildar Jyoti Devare)) यांची पारनेर येथून बदली करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांच्या मागणीचा विचार न झाल्यास 25 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत सार्वत्रीक निवडणुकीत, कोव्हिड सेंटर कॅम्पमध्ये कर्मचार्‍यांनी स्वतः केलेला खर्च आजही तहसीलदार देवरे यांनी आदा केलेेला नाही. तहसीलदार देवरे यांचे महिलांविषयी व सर्व कर्मचारी वर्गाविषयीचे दडपशाहीचे धोरण, चुकीचे काम करण्यासाठी दबाव टाकण्याची कार्यपध्दती, नियोजनशून्य कारभार तसेच राजकियदृष्टया सक्रिय होऊन कारभार करणे आदी बाबींमुळे सर्व कर्मचारी वर्ग वैतागलेला आहे. आजही त्या कर्मचार्‍यांना सूड भावनेची वागणूक देतात.

कर्जुलेहर्या प्रकरणात महिला तलाठी लता निकाळजे यांच्यावर प्रचंड दबाव टाकला होता. त्यावेळी निकाळजे यांचे मानसिक संतुलन खराब झालेले होते. निकाळजे यांची दप्तर तपासणी करून निलंबित करण्याची धमकी देखील देण्यात आली. अरुण आंधळे यांनी माहितीच्या अधिकारात मागविलेली माहिती दिली. या कारणास्तव महसूल सहाय्यक दिगंबर पवार यांच्याकडील जमीन संकलनाचा कार्यभार आकस बुध्दीने काढून घेण्यात आला. कार्यालयात कलम 155 अन्वये दुस्तीसाठी दाखल करण्यात आलेले प्रस्ताव, ऑनलाईन मान्यतेसाठीचे प्रस्ताव, हस्तलिखित प्रस्ताव त्यावर तहसिलदार देवरे महिना महिना सह्या करीत नाहीत, निर्णय घेत नाहीत. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर तलाठी, मंडल अधिकारी यांना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागते.

वरीष्ठ अधिकारी आढावा घेण्यासाठी आले असता सर्व काम न होण्याचे खापर कर्मचार्‍यांच्या माथी फोडले जाते. अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतूक याबाबत कर्मचारी, पथके यांनी कारवाई केलेली वाहने शासकीय दंड वसूल न करता सोडून देण्यात आलेली आहेत. त्याचे पुरावे सादर करण्यात येऊन त्यांनी कोट्यावधींचा महसूल बुडविला असल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे. कार्यालयीन खर्च निधीतून 2019-20 तसेच 2020-21 मध्ये कर्मचारी वर्गाला साधी टाचणीही पुरविण्यात आली नसल्याचेही नमुद करण्यात आले आहे. देवरे (Tahsildar Jyoti Devare) या महिला कर्मचार्‍यांनाही चांगली वागणूक देत नाही. त्या पारनेर (Parner) येथे रूजू झाल्यापासून महिला कर्मचार्‍यांना वेळी अवेळी बैठकांना बोलविणे, रात्री उशिरापर्यंत बैठका घेणे, दबाव टाकणे असे प्रकार सुरू असतात. त्यांना विनंती केली असता मी देखील महिला आहे असे सांगून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com