तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार

तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार

अहमदनगर/पारनेर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे (Parner Tahsildar Jyoti Devare) यांच्या विरोधात ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या तक्रारींची विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर (Orders of Divisional Commissioners) प्रशासकीय चौकशी झालेली आहे. त्यात देवरे या दोषी (guilty) आढळून आल्या असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.

ज्येष्ठ नागरिक अरूण आंधळे (रा. कर्जुलेहर्या) व निवृत्ती कासोटे (रा. कासारे) यांनी दि. 22 जुलै रोजी जिल्हाधिकारी (Collector) तसेच विभागीय आयुक्तांकडे तहसीलदार देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्याची चौकशी होऊन देवरे (Devare) यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंधळे यांनी नगर (Nagar) तसेच नाशिक (Nashik) येथे उपोषण केले होते. त्यानंतर या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. भूसंपादन विभागाच्या (Department of Land Acquisition) उपजिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात येऊन या समितीने जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर केला होता. यात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे.

तहसीदार देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांनी प्रांताधिकार्‍यांच्या अधिकारावर अतिक्रमण केले असून अकृषक जमिनीबाबत निर्णय घेण्याचे त्यांना अधिकार नसताना त्यांचा वापर केला. पारनेरमधील कोविड सेंटरबाबत अहवाल (Covid Center Report) वरिष्ठांना दिलेला नाही. यासह वाळू, गौणखनिज दंडाची रक्कम शासनाला भरलेली नाही. यासह अन्य ठपका त्यांच्यावर चौकशी समितीने ठेवलेला असून याबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांनी विभागीय महसूल आयुक्तांना पाठविलेला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com