पारनेरची यंत्रणा आ. लंकेच्या 
दावणीला बांधली काय ?

पारनेरची यंत्रणा आ. लंकेच्या दावणीला बांधली काय ?

भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचा सवाल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्रातांधिकार्‍यामार्फत अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी (Threat of filing a crime of atrocity) दिली जाते. पोलीस अधिकार्‍यासमोर मारहाण (Beating) केली जाते. जिल्हाधिकारी (Collector) फक्त चौकशी सुरू असल्याचे साचेबध्द उत्तर देतात. पारनेर (Parner) तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा राष्ट्रवादीचे आ. निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) यांच्या दावणीला बांधली आहे काय? असा सवाल भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (BJP state vice president Chitra Wagh) यांनी नगर (Nagar) येथे केला. राज्यातील सत्ताधारी आमदारांच्या बाबतीतच हे सगळे का घडते असा सवाल करतानाच राज्यातील पोलीस यंत्रणाच सत्तेच्या दावणीला बांधली का? याचे उत्तर राज्य सरकारने (Maharashtra Government) द्यावे, अशी मागणी वाघ यांनी केली.

भाजपा नेत्या वाघ (BJP state vice president Chitra Wagh) यांनी मंगळवारी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Devare), ग्रामीण रूग्णायाचे डॉक्टर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड, शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, सचिन पारखी, नगर शहर महिला अध्यक्षा अंजली वल्लाकट्टी यावेळी उपस्थित होत्या.

देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांच्यावरील आरोपाची चौकशी महसूल यंत्रणा (Revenue System) करेल. त्याबरोबर की चुकीच्या हे चौकशीत ठरेल, पण पोलिसांसमक्ष महिला आरोग्य अधिकार्‍यांनी शिवीगाळ करणे, क्लार्कला मारहाण (Clark Beating) करणे, महसुलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याचे अधिकार आ. लंकेंना कोणी दिले. हे सगळे डोळ्यादेखत होत असताना पोलीस यंत्रणा गप्प का? ती आ. लंकेच्या (MLA Nilesh Lanke) दावणीला बांधली आहे का? याचे उत्तर सरकारने जनतेला द्यावे, अशी मागणी वाघ यांनी केली. जिल्हाधिकार्‍यांकडे विचारणा केली तर ते चौकशी सुरू आहे, इतकेच साचेबध्द उत्तर देत आहेत. चौकशी अहवाल लिक कसा झाला? असा सवालही वाघ यांनी केला. राज्यातील पोलीस (Maharashtra Police) महिलांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी सत्ताधारी आमदारांना साथ देत असल्याचा आरोप वाघ यांनी केला. देवरे या खंबीर झाल्या आहेत. लढेंगे, भिडेंगे, जितेंगे या भूमिकेतून त्या वावरत असल्याने त्यांचे अभिनंदन.

महसूलमंत्री, गृहमंत्र्यांना भेटणार

देवरे यांच्या प्रकरणाबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार आहे. महसूल विभागाचे सर्वेसर्वा नगर जिल्ह्यात असून त्यांनी एक अवाक्षरही काढले नाही, हे दुर्देव असल्याचे वाघ म्हणाल्या. दीपाली चव्हाण यांच्यासारखीच सरकार देवरे यांच्या मरणाची वाट पाहत आहे का? त्या गेल्यानंतरच सरकार दखल घेणार का? त्या जीवंत असताना सरकार काहीच करणार नाही का? असे सवाल करत या सगळ्यांची उत्तरे सरकारने द्यावी अशी मागणी वाघ यांनी केली.

राज्यस्तरीय समितीकडून चौकशी व्हावी

या प्रकरणाची चौकशी स्थानिक पातळीवरील समितीकडून न होता ती राज्यस्तरीय समितीकडून व्हावी, अशी मागणी करतानाच भाजप तहसीलदार देवरे यांच्या पाठीशी असल्याचे वाघ यांनी सांगितले. राज्यातील अनेक महिला तहसीलदारांनी मेसेज करून त्यांच्यावरही अशाच प्रकारे दडपशाही सुरू असल्याचे कळविले आहे. त्याची खातरजमा करून त्यावरही आवाज उठविला जाणार आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष नियुक्तीला सरकारला वेळ मिळत नाही. जिल्हाधिकार्‍यांनी नियुक्त केलेली समितीच आरोपींना सल्ले देत असल्याचा गंभीर आरोप वाघ यांनी केला.

Related Stories

No stories found.