पारनेर तहसीलदार देवरे प्रकरण : उपजिल्हाधिकारी स्तरावरील चौकशी पूर्ण

दोन सरकारी डॉक्टरांसह, वाहन चालकांची चौकशीला दांडी
पारनेर तहसीलदार देवरे प्रकरण : उपजिल्हाधिकारी स्तरावरील चौकशी पूर्ण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणात (Parner Tahsildar Jyoti Deore case) महिला आयोगाच्या आदेशानूसार (Orders of the Women Commission) गठीत केलेल्या उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) यांच्या स्तरावरील चौकशी गुरूवारी पूर्ण झाली आहे. या प्रकरणातील 18 जणांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. यातील तिघांना शेवटची संधी देऊनही त्यांनी गुरूवारी चौकशीला (Inquiry) सामोरे जाणे टाळले. यात पारनेर ग्रामीण रुग्णालयातील (Parner Rural Hospital) दोन महिला डॉक्टरांसह तहसीलदार देवरे (Tahsildar Jyoti Deore) यांच्या वाहनचालकाचा समावेश आहे.

दरम्यान, महसूल विभागाच्या (Department of Revenue) सुत्रानुसार उपजिल्हास्तरावरील चौकशी पूर्ण (Inquiry complete) झाली असून चौकशी अहवाल गोपनिय असल्याने तो पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी (Collector) यांना सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी (Collector) आपल्या अभिप्रयानुसार तो अहवाल (Report) राज्य महिला आयोगाला (State Women Commission) सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. पारनेरच्या तहसीलदार देवरे (Parner Tahsildar Jyoti Deore) यांची आत्महत्येची ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio Clip Viral) झाल्यानंतर त्याची दखल घेत राज्य महिला आयोगाने (State Women Commission) देवरे (Parner Tahsildar Jyoti Deore) यांना होणार्‍या त्रासाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ (Deputy Collector Pallavi Nirmal) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठीत केली होती. या समितीत उपजिल्हाधिकारी महसूल आणि सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदार माधुरी आंधळे (Tahsildar Madhuri Andhale) यांचा समावेश होता.

या समितीने 18 जणांना चौकशीसाठी बोलावले होते. यातील 13 लोक मंगळवारी चौकशीला आले होते. तर तक्रारदार स्वत: तहसीलदार देवरे, त्यांचा वाहन चालक बाबा औटी, पोलीस उपनिरिक्षक प्रमोद वाघ, पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. मनिषा उंद्रे आणि श्रध्दा अडसुळ या गैरहजर होत्या. यातील दोघांनीच गुरूवारी चौकशीला हजेरी लावली. मात्र, दोन डॉक्टरांसह वाहन चालक हे अंतिम संधी दिल्यानंतरही गैरहजार राहिलेले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणात 18 पैकी 15 जणांच्या चौकशीच्या आधारे, त्यांनी सादर केलेले पुराव, यानूसार चौकशी समिती आपला अहवाल तयार करून तो जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सादर करणार आहेत. त्यानंतर तो राज्य महिला आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com