पारनेर तालुक्यातील 6 गुंडांवर तडिपारीची कारवाई

पारनेर तालुक्यातील 6 गुंडांवर तडिपारीची कारवाई

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील पारनेर, अळकुटी, लोणी मावळा, राळेगण थेरपाळ 1, वडगाव गुंड येथील 6 जणांवर 6 महिन्यांसाठी तडिपारीची कारवाई प्रांताधिकारी गणेश राठोड यांनी केली आहे.

सौरभ उर्फ बंड्या भिमाजी मते (रा. पारनेर), राहुल अंकुश गुंड (रा. वडगावगुंड), सुनील उर्फ काळ्या सोनवणे (रा. राळेगण थेरपाळ), गणपत रामचंद्र जाधव (रा. आळकुटी), संजय बबन शेलार (रा. पाडळी रांजणगाव) अशी तडिपार करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

अगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा सुव्यवस्थेस कोणतीही बाधा उत्पन्न होऊ नये यादृष्टीने पारनेर, श्रीगोंदा उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांतधिकारी गणेश राठोड यांनी पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काढलेल्या नोटीसनुसार सहा जणांना अहमदनगर जिल्ह्यातून सहा महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार केलेल्यांंवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना वेळोवेळी अटक करण्यात आली आहे. परंतु न्यायालयातून जामिनावर आल्यावर त्याने गुन्हे करण्याचे कृत्य चालूच ठेवलेले आहे.

त्याच्या अशा गुन्हे करण्याचा वृत्तीमुळे पारनेर तालुक्यात त्यांची मोठी दहशत निर्माण झाली होती. म्हणून या सहा सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याची पारनेर पोलीस ठाण्यामार्फत दंडधिकारी राठोड यांच्या कार्यालयास प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. या प्रस्तावावर साधक - बाधक विचार करीत पारनेर उपविभागीय दंडधिकारी तथा प्रांताधिकारी गणेश राठोड यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करीत सहा जणांना अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यांना पारनेर तालुक्यासह हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com