
पारनेर (तालुका प्रतिनिधी)
रेशन दुकानदारास कारवाईची भिती दाखवत कारवाई टाळण्यासाठी २० हजाराची लाच मागून तडजोडी अंती १५ हजार रूपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने पारनेर तहसिल कार्यालयातील पुरवठा निरिक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आज अटक केली. विठ्ठल मच्छिंद्र काकडे असे पकडण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून तो पारनेर तहसिल कार्याल्यात पुरवठा निरिक्षक या पदावर कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी यादववाडी येथील स्वतस्त धान्य दुकानातून नागरीकांच्या सुविधेसाठी वाडेगव्हाण येथील लाभार्थ्यांना धान्याचे वाटप केले. म्हणुन कारवाई करण्याची धमकी देत ही कारवाई टाळण्यासाठी काकडे याने तक्रारदाराकडे 20 हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 15 हजार रूपये रक्कम देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली होती. त्यानुसार 24 मे रोजी सापळा रचण्यात आला होता. यावेळी त्यांनी 15 हजार रूपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणुन आज शनिवारी(दि.1) सकाळी काकडे याच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचेद उपाअधिक्षक प्रविण लोखंडे यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शरद गोर्डे, कर्मचारी रमेश चौधरी, सचिन सुद्रीक, बाबासाहेब कराड, दशरथ लाड यांनी ही कामगिरी केली.