एसटी बस-स्कार्पिओची समोरासमोर धडक

जिवितहानी टळली
एसटी बस-स्कार्पिओची समोरासमोर धडक

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सुपा- पारनेर रोडवर (Supa Parner Road) जांभुळओढ्यात एसटी बस व स्कार्पिओ यांची समोरासमोर धडक (ST Bus and Scorpio Accident) होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वहानाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ही  घटना गुरूवारी (दि.16) सकाळी घडली.  

एसटी बस-स्कार्पिओची समोरासमोर धडक
अरणगाव दुमाला दरोड्यानंतर काही अंतरावरच पुन्हा जबरी चोरी

याबाबत सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पारनेर एसटी डेपोची बस (ST Bus) क्रमांक एमएच 40 एन 8743 ही गाडी पारनेर हून सुप्याला येत असताना सुपा जाभुळओढा येथे त्याच्या वेळी सुप्याकडून एमआयडीसीत (Supa MIDC) जाणारी स्कार्पिओ गाडी क्रमांक एमएच 16 बीझेड 8537  ही त्यावेळी तेथुन जात असताना स्कार्पिओच्या पुढे चाललेली प्रवासी  रिक्षा अचानक थांबली.

एसटी बस-स्कार्पिओची समोरासमोर धडक
नगरमध्ये ‘त्या’ तरुणाचा मृत्यू इन्फ्लूएंझा आणि करोनामुळे

यामुळे स्कार्पिओ चालकाने उजव्या बाजुला अचानक गाडी वळवल्याने समोरून आलेल्या एसटीबसची धडक झाली. यात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले परंतु यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. जर स्कार्पिओ चालकानी प्रसंग पाहून गाडी बाजुला  काढली नसती  तर मग मात्र रिक्षाला जोराची धडक बसुन जिवीत हानी झाली आसती.

एसटी बस-स्कार्पिओची समोरासमोर धडक
आज-उद्या अवकाळीचे संकट

घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस (Supa Police) तात्काळ घटना स्थळी दाखल झाले. दोन्ही वहाने रस्ताच्या बाजुला घेत वहातुक पुर्वत चालू केली. सुपा  पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप चौधरी पुढील तपास करत आहेत. 

एसटी बस-स्कार्पिओची समोरासमोर धडक
इतिहासात प्रथमच साई संस्थानच्या तिजोरीच्या चाव्या महिलेकडे
एसटी बस-स्कार्पिओची समोरासमोर धडक
भूसंपादनासाठी ठेवलेल्या रकमेतून 75 टक्के पैसे गायब
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com