सुपा-पारनेर रस्त्यावर अपघात; ग्रामसेवक जागीच ठार

सुपा-पारनेर रस्त्यावर अपघात; ग्रामसेवक जागीच ठार

पारनेर | तालुका प्रतिनिधी

सुप्यावरून पारनेरकडे येणाऱ्या कारची झाडाला जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ग्रामसेवक गणेश सयाजी फुलसौंदर जागीच ठार झाले. ते ३५ वर्षांचे होते.

यासंदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार, फुलसौंदर हे नगरहून आपले कामकाज आटोपून पारनेरकडे येत होते. हंगे ओलांडून आल्यानंतर आमकडा वस्ती येथे त्यांची कार नियंत्रण सुटून विरूध्द दिशेला जात समोरच्या झाडाला धडकली. ही धडक इतकी जोराची होती की प्रचंड आवाज होऊन आजूबाजूच्या वस्त्यांवरील नागरीक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

सुपा-पारनेर रस्त्यावर अपघात; ग्रामसेवक जागीच ठार
Forbes च्या Top 20 आशियाई महिला उद्योजकांची यादी जाहीर, भारतातील तिघींचा समावेश

नागरीक घटनास्थळी पोहचले त्यावेळी फुलसौंदर यांच्या कारचा चक्काचूर झाला होता. त्यांच्या उजव्या हाताला मोठी जखम होऊन ते सिटवर निपचित पडले होते. आ. नीलेश लंके यांचे बंधू दिपक लंके यांनी तरूणांच्या मदतीने फुलसौंदर यांना वाहनाबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या बाजूचा दरवाजा उघडत नसल्याने अखेर विरूध्द दिशेचा दरवाजा तोडून काढून त्यांना बाहेर काढण्यात आले.

दरम्यानच्या काळात १०८ रुग्णवाहीकेलाही आगोदरच संपर्क करण्यात आल्याने रूग्णवाहीकाही घटनास्थळी दाखल झालेली होती. त्यांना तात्काळ रूग्णवाहीकेतून पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. हंगेकरांनी मदतीची तत्परता दाखविल्याने फुलसौंदर हे अपघातानंतर थोडयाच वेळात रूग्णालयात पोहचले. परंतू तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता ते गतप्राण झाल्याचे त्यांनी घोषीत केले.

सुपा-पारनेर रस्त्यावर अपघात; ग्रामसेवक जागीच ठार
रुपाली भोसलेचा राजेशाही थाट, सुंदर फोटोशूटवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

गणेश सयाजी फुलसौंदर हे दरोडी व अक्कलवाडीचे ग्रामसेवक होते. कामात अतिशय वक्तशीर असलेले फुलसौंदर हे त्यांच्या मित्र परीवारात अतिशय लोकप्रिय होते. त्यांच्या अपघाताची माहीती समजताच संघटनेचे अध्यक्ष संजय गवळी, पंचायत समितीचे रमेश औटी तसेच ग्रामसेवकांनी रात्री ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली.

गुरूवारी सकाळी फुलसौंदर यांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्यांच्या मुळ गावी भांडगांव ता. पारनेर येथे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी तसेच एक साडेतिन वर्षांचा मुलगा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com