
पारनेर | तालुका प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील सुपा येथील महामार्गालगतच्या संगमेश्वर मंदीरासमोरील ओढ्यात मृत अवस्थेत आढळून आलेल्या तरुणाचा खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. खंडू रघुनाथ औटी (वय २४, रा. पाडळी आळे, ता. पारनेर) असे मृताचे नाव असून, प्रवीण पुंडलिक गोलाईत (३४) या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .