पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

खडी क्रशरवर करण्यात आलेले गौण खनिजाचे क्रशींग व त्यासाठी वापरण्यात आलेले विजबिल यातील तफावतीनुसार

शासनाच्या स्वामीत्वधनास चुना लावणार्या तालुक्यातील 10 खडीक्रशर चालकांना तहसिलदार ज्योती देवरे यांनी नोटीस बजावल्या असून त्यांना 16 कोटी 1 लाख 13 हजार रूपये इतकी दंडात्मक रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तालुक्यातील खडीक्रशर चालक अवैधरित्या गौणखनीजाचे क्रशींग करीत असून त्यातून शासनाच्या कोट्यावधींच्या महसूलास चुना लावला जात आहे .तहसिलदार ज्योती देवरे यांनी महसूल बुडविणार्या खडीक्रशर चालकांना नोटीस बजावल्या आहेत.

तालुक्यातील परवानाधारक तसेच विनापरवानाधारकांकडून करण्यात आलेल्या गौणखनीजाचे क्रशींग तसेच त्यासाठी वापरण्यात आलेली वीज याची तुलना करून खडीक्रशर चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीकडून सबंधितांनी वापरलेल्या विजेचा तपशील मागविण्यात येऊन ही कारवाई करण्यात आली.

सर्वसाधारणपणे एका ब्रासकरीता विजेचे 13 युनिट लागतात. या परिमानानुसार तपासणी करण्यात येऊन स्वामीत्वधनाच्या रकमांचा आढावा घेण्याचे आदेश विभागिय आयुक्त तसेच जिल्हाधिकार्यांनी तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार तहसीलदार देवरे यांनी ही कारवाई केली आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) व (8) प्रमाणेअवैधपणे गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आल्याने बजावण्यात आलेला दंड का वसूल करू नये अशी नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीला मुदतीत उत्तर न दिल्यास महसूल अधिनियम 966 मधील तरतुदींनुसार महसूल विभागाची थकबाकी म्हणून ही रक्कम वसूल केली जाणार असल्याचे तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.

क्रशरचालक व त्यांना करण्यात आलेला दंड पुढीलप्रमाणेः नंदकुमार औटी, पारनेर 20 लाख 54 हजार, निलेश खोडदे, गोरेगांव 10 लाख 64 हजार, विठठल झावरे, वासुंदे 46 लाख 40 हजार, भाउसाहेब बोठे, आपधुप 37 लाख 64 हजार, नितीन गायकवाड, कडूस 1 कोटी 42 लाख 86 हजार, सचिन शेळके,यादववाडी 6 कोटी 1 लाख 16 हजार, शंकर मेहेर, पिंपळगांवरोठा 95 लाख 76 हजार, दत्तात्रेय लाळगे, पठारवाडी 2 कोटी 11 लाख 64 हजार, सुनिल पवार, पठारवाडी 2 कोटी 28 लाख 20 हजार, अंकुश रोकडे, 2 कोटी 6 लाख 28 हजार.