कर्मचारी संपावर तहसीलदार कामावर

तहसीलदार देवरे : नागरिकांची कामे अडून देणार नाही
कर्मचारी संपावर तहसीलदार कामावर

पारनेर (प्रतिनिधी)

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मनमानी व दडपशाही धोरणाच्या विरोधात महसूल कर्मचार्‍यांनी 25 ऑगस्टपासून काम बंद आंदोलन करत संप केला आहे.

तर दुसरीकडे नागरिकांची कुठलीही कामे अडू नये म्हणून स्वतः तहसीलदार देवरे यांच्यासह नायब तहसीलदार व इतर अधिकारी नागरिकांची कामे मार्गी लावत आहेत. एकीकडे कर्मचारी संपावर असताना देखील नागरिकांची कामे प्रलंबित राहू नये म्हणून स्वतः तहसीलदार कर्मचार्‍यांच्या भूमिकेतून नागरिकांची कामे मार्गी लावत आहेत.

तहसीलदार देवरे मनमानी व दडपशाही करत असून मनमानी करत असल्याचा आरोप करत महसूल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी, कारकून व इतर असे 41 कर्मचारी काम बंद आंदोलनात 25 ऑगस्टपासून सहभागी झालेले आहेत. कर्मचार्‍यांच्या आंदोपणाबाबत तहसीलदार देवरे यांना कुठलीच लेखी कल्पना अथवा तक्रार मिळाली नसल्याचे तहसीलदार देवरे यांनी सांगितले. कर्मचारी जरी संपावर असले तरी नागरिकांची कुठलीच कामे प्रलंबित राहणार नसून आम्ही मी स्वतः तहसीलदार, नायब तहसीलदार अविनाश रणदिवे, नायब तहसीलदार माळवे आदींसह इतर अधिकार्‍यांच्या मदतीने नागरिकांचे कामे मार्गी लावत आहोत.

महसुलचे कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन सुरू असून नागरिकांचे कामे अडून राहतील असा गैरसमज नागरिकांच्यात असून तसे काही न होता आम्ही स्वतः तहसीलदार, नायब तहसीलदार नागरिकांचे कामे मार्गी लावत आहोत. नागरिकांची कुठलीच कामे प्रलंबित राहणार नाही. नागरिकांनी गैरसमज करू नये. कोणाची काही कामे असल्यास माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार देवरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com