पारनेर एसटी आगाराचे साठ लाखांचे उत्तपन्न बुडाले

पारनेर एसटी आगाराचे साठ लाखांचे उत्तपन्न बुडाले

एसटी कर्मचारी आंदोलनाचा परिणाम

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

राज्यभरात एसटी कर्मचार्‍यांनी शासनात विलीनीकरण तसेच आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद अंदोलन पुकारले आहे. संपास अकरा दिवस झाले असून या दिवसात एकट्या पारनेर एसटी आगाराचे साठ लाखांचे उत्पन्न बुडाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

7 नोव्हेंबर 2021 पासुन एसटी कर्मचार्‍यांनी राज्यभर आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे . यात राज्य सरकारी कर्मचार्‍यांत सामावून घ्या या प्रमुख मागण्यांसह इतर काही मागण्या आहेत. या आंदोलनात पारनेर आगारातील 283 पैकी 274 कर्मचारी संपावर गेले आहेत फक्त 9 कर्मचारी कार्यालयीन श्रेणीचे असल्या कारणाने कामावर रुजू आहेत , संपावर गेलेल्या 274 कर्मचार्‍यांमध्ये 19 महिला कर्मचारी आहेत. पारनेर बस स्थानकात आठ मालवाहतूक गाड्यांसह 45 प्रवासी बस दिवसभर विविध महामार्गावर धावत प्रवाशांची सेवा करत आहेत.

रोज सरासरी साडेपाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवत आसतात .गेल्या अकरा दिवसांपासून बसेस डेपोत उभ्या आहेत त्यामुळे रोजचे सरासरी साडेपाच लाखा प्रमाणे अकरा दिवसांत साडे साठ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न एकट्या पारनेर बस डेपोचे बुडाले आहे. एस टी कर्मचार्‍यांच्या मागण्याही रास्त आहेत .एक तर ते महामंडळाचे कर्मचारी म्हणून राज्य शासनाच्या सोई सुविधा मिळत नाहीत. त्यात तुटपुजे पगार ,तेही वेळेवर मिळत नाही,

महागाईच्या काळात या अल्पशा पगारावर घर चालवणे खुपच अवघड झाल्याने आतापर्यंत खुप एस टी कर्मचार्‍यांनी आपले जीवन संपवले आहे . यात कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत , तर सरकारही दोन पावले पुढे यायला तयार नाही . यातच कर्मचार्‍यांच्या परिवाराची दिवाळी अंधारात तर गेलीच तसेच महामंडळाचेही दिवाळे निघाले आहे तर इकडे ऐन दीपावलीत प्रवाशाची मोठी गैरसोय होत आहे.

लवकर तोडगा निघावा

अकरा दिवस झाले एस टी बंद आहे. यात शालेय विद्यार्थी ,दीपावलीतील माहेरवासीणी व अर्ध्या तिकिट वाल्या ज्येष्ठ नागरिकांची यामुळे मोठी अडचण झाली आहे. या सर्वांसाठी एस टी बस जिव्हाळ्याचा विषय आहे . कर्मचारी व शासन यांनी एकत्र येत मध्यवर्ती भूमिका घेऊन या संपावर लवकरात लवकर तोडगा काढावा,अशी सर्वसामान्य प्रवाशांची मागणी आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com