पारनेरच्या श्रीनागेश्वर मंदिरात धाडसी चोरी

अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास
पारनेरच्या श्रीनागेश्वर मंदिरात धाडसी चोरी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीनागेश्वर मंदिरात धाडसी चोरी झाल्याची घटना बुधवारी (दि.16) मध्यरात्री घडलीे. श्रीनागेश्वराची पिंड आणि माता पार्वतीच्या तांदळ्यावरील चांदी, दानपेटीतील रोख रक्कम अशी एकूण 2 लाख 51 हजार रुपयांची चोरी झाली आहे.

याप्रकरणी पुजारी योगेश शांताराम वाघ (रा. नागेश्वर मंदीर, ता. पारनेर) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 16 नोव्हेंबर रोजी साडेनऊच्या सुमारास नागेश्वर मंदिरातील पुजा करुन मुख्य दरवाजास कुलूप लावून मंदिर बंद करण्यात आले होते. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता नागेश्वर मंदिरात नेहमीप्रमाणे पुजा करण्यासाठी ते गेले असता मंदिराचा दरवाजा उघडा दिसला.

मंदिरातील महादेवाच्या पिंडी वरील चांदीचे आवरण, पार्वतीच्य पिंडीवरील चांदीचे आवरण चोरुन नेल्याचे आढळून आले. तसेच दानपेटी फोडून त्यातील रोकड असा एकुण 2 लाख 51 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे आढळून आले. यावरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्ह पारनेर पोलिस ठाण्यात गुन्ह दाखल केला आहे. नागेश्वर मंदि हे भाविकांचे मोठं श्रद्धास्थान आहे. दर्शनासाठी लोक इथे येतात. पारनेरकराचे श्रंधास्थान असलेल्या नागेश्वर मंदीरात यापुर्वीही चोरी झाली होती. चोरांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी पारनेरकर करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com