पारनेर तालुक्यात 310 ब्रास वाळू साठा जप्त!
File Photo

पारनेर तालुक्यात 310 ब्रास वाळू साठा जप्त!

तहसीलदार देवरे यांची कारवाई

पारनेर/सुपा |प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील मांडवे येथे महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये 310 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या वाळू साठ्याचा जागेवरच लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.

पारनेर तालुक्यात मांडवे येथे अवैधरित्या वाळू मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात काढली जात आहे. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून वेळोवेळी पोलीस व महसूल प्रशासनाच्या कारवाया होत आहेत. सोमवारी महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईमध्ये मांडवे नदीच्या काठावर उत्तर बाजूस शासकीय जागेत 210 ब्रास बबन बागुल यांचा वाळू साठा तसेच दिनकर गागरे याचा 100 ब्रास असा एकूण 310 ब्रास वाळू साठा अंदाजे किंमत 10 लाख तहसीलदार देवरे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आला आहे.

हा साठा जप्त करून त्याचा जागेवरच लिलाव करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. तहसीलदार देवरे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे परिसरातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. या पथकात हवालदार भालचंद्र दिवटे. सत्यम पवार आदींचा सहभाग होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com