100 ब्रास वाळू साठ्यासह 40 लाखाचा मुद्देमाल जप्त

पारनेर तालुक्यातील नागापूरवाडीत पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांची कारवाई
100 ब्रास वाळू साठ्यासह 40 लाखाचा मुद्देमाल जप्त

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील मुळा नदीपात्रातील पळशी येथील नागापूरवाडीच्या डुबेवाडीत गट नंबर 129 व गट नंबर 131 मध्ये अवैध वाळू उपसा करणार्‍या

एक पोकलॅनसह दोन टॅक्टरवर बुधवारी (दि. 24) सायंकाळी कारवाई करण्यात आली. पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत 40 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा प्रकरणी पळशीचे कामगार तलाठी राम पिराजी शिरसाठ यांनी फिर्याद दिली असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्यामार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक घनश्याम बळप व नायब तहसीलदार माळवे यांनी ही कारवाई केली. सबंधित वाहने पंचनामा करून पारनेर पोलिस ठाण्यात आणून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पथकामध्ये पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, नायब तहसीलदार एम. ए. माळवे, क्लार्क सलगरे, कामगार तलाठी शिरसाठ, एरंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, सत्यम शिंदे आदींचा समावेश होता.

या अवैध वाळू उपसाप्रकरणी वैभव उर्फ बाल्या बाळकृष्ण पायमोडे (रा. टाकळी ढोकेश्वर), बबन रामराव पाडोळे (रा. पुसद, जिल्हा यवतमाळ), सुनिल गंगाराम मेंगाळ (रा. नागपुरवाडी), सागर राजेंद्र केदार, सुनील मेंगाळ यापाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.

पारनेर पोलिसांनी मुळा नदीपात्रात तालुक्यातील महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्तरीत्या राबविलेल्या मोहिमेत नागापुरवाडीच्या डुबेवाडी येथील अवैध वाळू उत्खनन वाहतूक करणान्यांविरोधात बुधवारी उशीरा केलेल्या कारवाईत सुमारे 100 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. एकपोकलॅन मशीन व दोन ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले आहेत.

याठिकाणी पोकलॅनच्या साह्याने दोन परस अवैध वाळू उपसा उत्खनन केले आहे. त्यामुळे महसूल विभागाच्यावतीने सुद्धा याठिकाणी पंचनामा केला जाणार आहे. या कारवाईत एकूण 40 ते 50 लाखांचा अवैध उत्खनन व वाळू साठा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पारनेर पोलिसांच्या या कारवाईमुळे वाळुतस्करांचे धाबे दणाणले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com