पारनेर महसूल विभागामध्ये मनुष्यबळाची वाणवा

कामे पूर्ण करताना होतेय तारेवरची कसरत
पारनेर महसूल विभागामध्ये मनुष्यबळाची वाणवा

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

प्रशासकीय दृष्ट्या महत्वाचा विभाग असणार्‍या पारनेर महसुल विभागात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता आहे. यामुळे एका छताखाली विविध कामे पुर्ण करताना आहे त्या अधिकारी, कर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे वास्तव आहे.

पारनेर तहसिल कार्यालयात जवळजवळ 22 कर्मचारी कमी आहे. अशातच जिल्हाधिकारी कार्यालयाने कर्मचारी कपातीचे धोरण राबवले असल्याने विभागप्रमुखाना मोठ्या ताणतणावाला तोंड द्यावे लागत आहे. महसुलातील कामाची जबबादारी असणारे तहसिलदारांचे कार्यालयीन साह्यक, महसुल साह्यक या माहत्वच्या ठिकाणी अवघे चार कर्मचारी असल्याने अनेक अडचणी उभ्या रहात आहेत.

यातील प्रशासकीय कामकाज, पुरवठा विभाग, गौण खनीज, अर्थ विभाग व निवडणुक या आति महत्त्वाच्या ठिकाणच्या जागा रिक्त आहेत. उपलब्ध कर्मचार्‍यांमध्येही काही रजेवर आहेत तर काही विविध कारणानी उपस्थित रहात नाहीत. यासह तृतीय वर्गातील वहान चालक , शिपाई , स्वच्छता कर्मचारी व वाँचमन ही पदेही रिक्त आसल्याने सर्वप्रकारच्या महसुल कामकाजाला ब्रेक लागला आहे.

पारनेर तहसिल कार्यालयात तहसिलदार, नायब तहसिलदार ते शिपाई वाँचमन सह एकुण 93 मंजुर पदे आहेत. यातील 22 विविध पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक 9 तलाठी पदे रिक्तअसुन त्याखालोखाल 7 महसुल साह्यक पदे रिक्त आहेत. तर दोन वाँचमन एक वहान चालक, एक शिपाई, एक स्वच्छता कर्मचारी ही पदे रिक्त आहेत. यातील काही अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पद्दोनोतीने पुढे गेलेले आहेत. यामुळे नागरिकांच्या कामाचा वेग मदावत आहे. तर प्रमुखानाही आहे त्या मनुष्यबळात काम करताना मोठी कसरत करावी लागते. पारनेर तालुका विस्ताराने मोठा आहे. महसुली गावे मोठ्या प्रमाणात आहेत. कमी कर्मचार्‍यांत काम करताना तहसिलदार नायब तहसिलदार यांच्यावर मोठा ताण तणावाला सामोरे जावे लागत आहे.

मनुष्यबळ वाढवण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी केलेली आहे. कर्मचारी वाढवण्याचे अश्वासन सबंधीत विभगाने दिले आहे. कर्मचारी मिळाल्यावर जनतेच्या कामांची पुर्तता करणे व कामकाजाचा वेग वाढण्यास मोठी मदत होईल .

- शिवकुमार आवळकंठे, तहसीलदार पारनेर

तहसिलदार सरकारी वाहनाविना

पारनेर तहसिलदारांना गेल्या अनेक दिवसांपासुन सरकारी वाहन दिले गेलेले नाही. यामुळे त्यांना खाजगी वाहनाचा वापर करावा लागत आहे. वाळू तस्कर, रेशन धान्य चोरी, गौण खनिज कारवाई अशा कारवाया करताना तहसिलदारांना अंबर दिव्याच्या वाहनाची ओळख असते. तसेच त्याचा धाक असतो. पंरतु खाजगी वाहन असल्याने त्यांना खासगी व्यक्ती समजून त्यांच्यावर हल्ला होण्याचा धोका असल्याची भिती व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com