पारनेर तालुक्यातील उत्तर भागात अवकाळी पाऊस; वीज पडून तीन गायी दगावल्या

पारनेर तालुक्यातील उत्तर भागात अवकाळी पाऊस; वीज पडून तीन गायी दगावल्या

पारनेर तालुका | प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील पश्चिम व उत्तर भागात शुक्रवारी सांयकाळी मेघ गर्जनेसह आवकाळी पाऊस पडला. पावसाचे प्रमाण जरी आल्प आसले तरी पळसी येथील लताबाई भोरु वाघ याचा तीन गायी वीज पडल्याने दगावल्या आहेत.

याबाबत पारनेरचे तहासिलदार अवळकंठे व स्थानिक कामगार तलाठी जाधव यांनी सांगितले कि, शुक्रवारी रात्री साधारणपणे सात ते आठच्या दरम्यान सोसाट्याच्या वारा व मोठ्या प्रमाणात विजाच्या कडकडाटासह पावसास सुरवात झाली. राञी आठ च्या आसपास पोखरी येथील चिमणी बारव जवळ वास्तव्यास आसलेल्या लताबाई भोरु वाघ यांच्या गुराच्य गोठ्यावर विज कोसळली व त्यात लताबाई यांच्या तीन गायी जागीच दगावल्या अशी माहिती कामगार तलाठी जाधव यांनी दिली.

घटनेची माहिती कळताच पारनेरचे तहसिलदार आवळकंठे यांनी तलाठी व पशुसवर्धन अधिकारी यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले वरील अधिकार्यानी घटनेचा पंचनामा करून लताबाई वाघ याचे सुमारे दिड लाख रुपयाचे नुकसान झाले अशे कळवले आहे. तशेच गुराच्या छपरवजा आसलेल्या गोठ्याचेही नुकसान झाले असुन वाघ परीवार वीज पडली तेथुन थोडे दुर रहात आसल्याने मनुष्य हानी झाली नाही अशे सरकारी आधिकार्यानी सांगितले.

दरम्यान शुक्रवारी सांयकाळी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, वडझिरे, भाळवणी परिसरात पाँईन्ट दोन ते तीन एम एम पाऊस झाल्याचे सरकारी अधिकार्यानी सांगितले आहे. विजाचे प्रमाण जास्त आसल्याने पोखरीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. वाघ परिवाराचे गायीच जगण्यचे साधन आसल्याने त्यांना आता मदत मिळावी अशी नागरीकाची मागणी आहे.

Related Stories

No stories found.