पारनेर तालुक्यात दमदार पाऊस

पारनेर तालुक्यात दमदार पाऊस

पारनेर | तालुका प्रतिनिधी

सोमवारी पारनेर तालुक्यात सर्वदुर जोरदार पाऊस झाला असुन अनेक ठिकाणी शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. तर आगामी रबी हंगामाच्या दुष्टीने शेतीची कामे थांबली आहे .

चालु वर्षी वरुण राजा जास्तच उदार झाला असुन सप्टेंबर महिना अर्धा संपत आला तरी जोरदार पाऊस पडत आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस परतीच्या प्रवासाला लागत असतो. परंतु चालू वर्षी अजुनही अनेक दिवस पाऊस पडणार असल्याचे हवामान तज्ञ सांगत आहेत.

या वर्षी पारनेर तालुक्यात सरासरी पेक्षा खुप जास्त पाऊस पडला असुन ओढे, नाले, तलाव तुंडूब भरले आहेत तर तालुक्याच्या पश्चिम भागातुन वहात येणाऱ्या नद्या (कुकडी व मुळा) वरील धरणे भरल्याने मोठ्या जोमाने वहात आहे. तर तालुक्यातुन जात आसलेला कुकडी डावा कालवाही गेल्या अनेक दिवसापासून वाहत आहे.

गेल्या काही दिवसापासून पारनेर तालुक्यात सतत पाऊस पडत आसल्याने शेतीची कामे थांबली आहेत. तर जी शेतात उभी पिके आहेत ती पाण्यामुळे सडू लागली आहे. यात सर्वाधीक नुकसान भाजीपाला पिकाचे होत आहे. वेळेवर काढणी होत नसल्याने ही भाजीपाला पिके सडून जात आहेत. यामुळे बाजारात ग्राहकांना महाग भाजीपाला घ्यावा लागत आहे. तर शेतकऱ्यांना हाता तोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत मातीमोल होत आहे .

सततच्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. बाजारभाव नसल्यामुळे गेल्या सहा ते आठ माहिन्यापासुन शेतकऱ्यांनी कांदा ऐरणीत जपुन ठेवला. मात्र आषाढ, श्रावण नंतर भाद्रपद महिना संपत आला तरी कांद्याला बाजार नसल्याने शेतकरी हवालदील झाला असुन पावसामुळे कांदा सडत आहे.

दसरा, दिपावलीला नवीन लाल कांदा बाजारात विक्रीला येण्याची वेळ झाली तरी बाजारभाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात गावराण जुना कांदा पडून आहे व या रोजच्या पावसाने झाकपाक करुन बळीराजा मेटाकुटीला आला आहे . या सततच्या पावसाने शेतीच्या कामासह जनजीवन थांबले आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com