
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
पारनेर पोलिसांनी (Parner Police) राळेगण थेरपाळ (Ralegan Therpal) येथील प्रमोद बंटी गव्हाणे यास बेकायदेशीर गावठी कट्टा (Gavathi Katta) बाळगणार्याला अटक (Arrested) केली. याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना बातमीदारामार्फत प्रमोद बंटी गव्हाणे (रा. राळेगण थेरपाळ ता. पारनेर) याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल (Gavathi Katta) असून तो गावात त्याच्या आधारे दहशत निर्माण करून गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत अशी माहिती मिळाली.
गायकवाड यांनी पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले राळेगण थेरपाळ (Ralegan Therpal) गावात जाऊन कारवाईचे आदेश दिले. त्यानूसार पोलीस पथकाने गव्हाणे याला पकडण्यासाठी राळेगणमध्ये सापळा लावला. मात्र, पोलीसांची चाहूल लागताच गव्हाणे पळून जात असताना त्यास शिताफीने पाठलाग पकडून पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात गावठी बनावटीची पिस्टल मिळून आले.
याबाबत गव्हाणे यास विचारपूस केली असता त्याने हा कट्टा मित्राकडून आणल्याचे सांगितले. पोलीस (Police) आता त्याच्या मित्राचा शोध असून तो अद्याप फरार आहे. पोलीसांनी गव्हाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.