पारनेर तालुक्यात कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ

पाऊस, दमट हवामानाचा शेतकर्‍यांना फटका
पारनेर तालुक्यात कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सततच्या पावसाने व दमट वातावरणाने कांद्या सडला असून शेतकर्‍यांच्या कांदाचाळी जागेवर बसल्या आहेत. यामुळे अनेक शेतकर्‍यांना जेसीबी यंत्राद्वारे चाळीतील कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याला बाजार नाही .त्यामुळे शेतकर्‍यांनी चाळीत कांदा साठून ठेवला आहे. साधारणपणे आषाढ महिन्यात साठवलेल्या गावरान कांद्याला चांगला दर मिळत असतो. परंतु चालू वर्षी आषाढ श्रावण नंतर भाद्रपद महिना संपला तरी कांद्याला बाजार मिळाला नाही. दोन दिवसांवर नवरात्रोत्सव येत आहे त्यामुळे या काळातही कांद्याला चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता कमीच असतेे. आज रोजी कांदा सरासरी दहा रुपये दराने विकला जात आहे.

वाढलेले बी बियाणाचे दर मोठी मजुरी, ट्रॅक्टर भाडे, औषधे, खते यांच्या गगनाला भिडणार्‍या किंमती हे सर्व करून कांदा पिकवला तर तो सहा महिने संभाळायचा व पुन्हा मजूर अथवा जेसीबी लाऊन तो सडलेला कांदा शेतात अथवा उकिरड्यात टाकायचा अशी शेतकर्‍यांवर वेळ आली आहे. एक किलो कांदा पिकवण्यासाठी दहा ते पंधरा रुपये खर्च येतो व तो सहा महिने सांभाळून फेकून देण्याची वेळ शेतकर्‍यांवर येत आहे. शासनाने कांद्याला हमीभाव द्यावा व आज रोजी होत असलेल्या पावसामुळे कांद्याची नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com