अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

पारनेर | तालुका प्रतिनिधी

अहमदनगर-पुणे महामार्गावर शुक्रावारी (दि.29) पहाटे पळवे शिवारात आज्ञात वहानाने धडक दिल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

याबाबत प्रसाद तरटे (रा.पळवे खुर्द) यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी पहाटे सुमारास पळवे खुर्द शिवारात हाँटेल धनश्री जवळ एका भरधाव अज्ञात वहानानी धडक दिल्याने एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती कळताच सुपा पोलिसांचे पथक रुग्णवाहीकेसह घटनास्थळी दाखल झाले.

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
संगमनेरात गॅस कटरने ATM मशीन फोडले, १४ लाख रुपये लंपास

तेथे पोलिसांनी पंचनामा केला असता अंदाजे 40 वर्षे वयाच्या पुरुषास अज्ञात वहानाने जोराची धडक दिली असुन यात सदर व्यक्ती गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला होता. सुपा पोलिसांनी प्रसाद तरटे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल कुटे पुढील तपास करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com