पारनेर - वाळवणे येथील समाजमंदीरात एकाची आत्महत्या

गळफास घेत केली आत्महत्या
पारनेर - वाळवणे येथील समाजमंदीरात एकाची आत्महत्या

सुपा | वार्ताहर | Supa

पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील समाजमंदिरात एकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. अनिल हरी शिंदे (वय ५२) असे त्या इसमाचे नाव असून वाळवणे येथील समाजमंदीरात शनिवारी सांयकाळी ६.३० च्या दरम्यान पञ्याच्या अंगलला दोरीच्या साह्याने फाशी घेतली.

आत्महत्या केलेल्या इसमाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, "माझा भाऊ आनिल यास मुतखड्याचा आजार होता. त्याचा त्रास जास्त प्रमाणात होत होता. झाला होता. याच्याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी." सुपा पोलिसानी आकस्मिक मृत्युची नोंद केली असून पुढीला तपास श्री. भोसले यांच्या मार्गदर्शना खाली पो.ना.एस बी .चौधरी करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com