पारनेरच्या उत्तर - पश्चिम भागात अतिवृष्टी

नदी नाल्यांना पूर, दोन पूल वाहिल्याने वनकुटे, पळशीचा संपर्क तुटला
पारनेरच्या उत्तर - पश्चिम भागात अतिवृष्टी

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर (Parner) तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात सोमवारी (दि.6) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) ढवळपुरी (Dhawalpuri), वनकुटे (Vankute), पळशी (Palshi) परीसरातील नदी नाल्यांना पूर (River Flood) आला आहे. पाणी शेतीत घुसल्याने पिकांचे (Crops), घरांचे (Home) तसेच रस्त्यांचे (Road) मोठे नुकसान (Loss) झाले आहे. ढवळपुरी (Dhawalpuri) ते वनकुटे (vankute) व वनकुटे ते पळशी (Palshi) या गावा दरम्यानच्या काळू नदीवरील (Kalu River) दोन पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने (The bridge was swept away in the floodwaters) या भागाचा संपर्क तुटला आहे.

सोमवारी रात्री अकरा वाजता मुसळधार पावसाला सुरूवात झाल्यानंतर पहाटे चाडेचार वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. यापावसाने ढवळपुरी, वनकुटे, पळशी या परिसरातील ओढे, नाले दुधडी भरून वाहत होती. परिणामी येथील काळू नदीला पूर (Kalu River Flood) आला होता. पुराचे पाणी किनार्‍यावरील शेतात घुसले तसेच पावसाचेही पाणी शेतांमधील सखल भागात साचून राहिल्याने बाजरीसह कांदा (Onion) व इतर पिकांचे मोठे नुकसान (Crops Loss) झाले आहे. संततधार पावसामुळे जिर्ण झालेल्या अनेक घरांची पडझड झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

पाळीव प्राण्यांनाही या अतिवृष्टीचा फटका बसला असून शेतामधील शेतमालाचेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दुर्गम असलेल्या या भागात वनकुटे ते ढवळपुरी तसेच पळशी ते वनकुटे असे ग्रामसडक योजनेमधून रस्ते तयार करण्यात आले असून या मार्गावरील काळू नदीवर बांधण्यात आलेले पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे या भागाचा संपर्क तुटला असून प्रशासनाने दळणवळणाची तातडीने सुविधा निर्माण करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मान्सूनला प्रारंभ झाल्यानंतर या परिसरासह तालुक्यात पावसाने हजेरी न लावल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते. गेल्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असले तरी अशा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी वर्गापुढे पुन्हा संकट उभे राहिले आहे. या भागात टोमॅटो तसेच डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. जोरदार पावसामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या पावसाने घरांची पडझड, तसेच शेतमालच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधितांना मदत देण्यात यावी. पुरात वाहून गेलेल्या पुलांची तातडीने दुरूस्ती करून गावांचा संपर्क कायम करण्यात यावा.

- अ‍ॅड. राहूल झावरे, सरपंच वनकुटे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com