पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर हरकतींचा पाऊस पडला असून 659 हरकती आल्या आहेत.

अनेक कुटुंबातील सदस्यांची दोन- दोन नावे वेगळ्या प्रभागात टाकून कुटुंबच फोडली आहेत. तर दुसरीकडे वाड्या वस्त्यांमध्ये तोडफोड करून नावाची विभागणी केली आहे.

पारनेर नगरपंचायतीची मुदत संपल्यावर प्रभाग रचना आरक्षण सोडतीत दोन-दोन नावे वेगवेगळ्या प्रभागांत समाविष्ट होऊन 15 फेब्रुवारी रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत अनेक प्रभागांत एकाच कुटुंबातील नावे दुसर्या प्रभागात टाकून कुटुंब दूर केली आणि वाड्या- वस्त्यांवर मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. वस्त्यांमध्ये फोडाफोड करून मतदारयादीत मोठ्या प्रमाणावर गडबड झाल्याचे मतदार यादी पाहिल्यावर दिसून आले. पारनेर नगरपंचायतीमध्ये एकूण 17 प्रभाग आहेत.

अनेक प्रभागांतील अनेकांची नावे मूळ प्रभाग सोडून वेगवेगळ्या प्रभागांत गेल्यावर मोठा गोंधळ उडाला. सतरा प्रभागांत इच्छुक असणार्या उमेदवारांनी 659 तक्रारी व हरकती घेतल्या आहेत. नगरपंचायतीच्या काही कर्मचार्यांना प्रभागाची माहिती असूनही अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील मतदार वेगळ्या प्रभागात टाकले आहेत. अशा प्रकारच्या सर्वाधिक हरकती पारनेर नगरपंचायतीकडे प्राप्त झाल्या आहेत तसेच पारनेर तालुक्यातील मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांची नावे सुद्धा या मतदार यादीत समाविष्ट झाली असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत.

पारनेर नगरपंचायती निवडणुकीसाठी 17 प्रभागात 659 हरकती प्राप्त झालेल्या आहेत. या हरकती जमा करण्याचा दि.22 शेवटचा दिवस होता. हरकती यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचा निपटारा करण्याचे काम सुरू आहे असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी सांगितले आहे. 1 मार्चला अंतिम मतदार यादी पारनेर नगरपंचतायतीच्या मतदारांची अंतिम मतदार यादी 1 मार्चला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रभाग 10,12,15,16 या महत्त्वाच्या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नावे आहेत. या चार प्रभागांमध्ये सुमारे 12 हजार 66 मतदार आहेत.