पारनेर नगरपंचायतीने बाजार कर आकारल्यास आंदोलन

शेतकरी, सेना नगरसेवकांचा इशारा
पारनेर नगरपंचायतीने बाजार कर आकारल्यास आंदोलन

पारनेर |प्रतिनिधी| Parner

तालुक्याचे ठिकाण असलेल्या पारनेर शहरांमध्ये रविवारचा बाजार अनेक वषार्ंपासून भरत आहे. 2004 पासून बाजारात कुठल्याही प्रकारचा कर अथवा पावती आकारली जात नव्हती. परंतु आता पारनेर नगरपंचायत बाजारात कर आकारण्याचा लिलाव करणार आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या नगरसेवक व शेतकरी यांनी कर आकारल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला अहे.

गेले 17 वर्ष पासून स्थानिक ग्रामपंचायत, नगरपंचायत यांना माजी आमदार विजय औटी यांनी निवडुण आल्यापासून कुणालाही कर अथवा पावती आकारून दिली नाही. परंतु आता शेतकर्‍यांना कुणी वाली राहिला नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर कुणाचे लक्ष राहिले नाही. विजय औटी यांच्या काळात ज्या पद्धतीने बाजार चालू होता तश्याच प्रकारे आत्ता चालावा अशी सर्व शेतकर्‍यांनी विनंती केली. नगरपंचायतने जर बाजार कर पावतीचा लिलाव केला तर पारनेर शहर व आठवडे बाजार बंद ठेवून तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शेतकरी स्थानिक ग्रामस्थ व शिवसेना नगरसेवकांनी दिला आहे.

शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे, ऋषिकेश गंधाडे, भाऊशेठ ठुबे, कांतीलाल ठाणगे, राजु शेख, शुभम देशमुख, तसेच ग्रामस्थ तुषार औटी, सागर वैद्य, तुषार ज्ञा. औटी, भीमराव औटी, राजुशेठ ठुबे, सुहास औटी, संदीप सोबले, बबन पठारे, शंकर औटी, दिनेश शिंदे,भाऊसाहेब येणारे, अविनाश ठुबे, वैद्य गुरुजी, नामदेव कावरे, पप्पू कावरे, मंगल चव्हाण, शाकु मावशी यांनी शेतकर्‍यांची मते जाणुन घेत हा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com