अभियंत्यावर कारवाईसाठी पारनेरमध्ये मूक मोर्चा

नगराध्यक्षांवर आरेरावी केल्याचा नोंदवला निषेध
अभियंत्यावर कारवाईसाठी पारनेरमध्ये मूक मोर्चा

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांना 5 एप्रिल रोजी पाणी पुरवठा अभियंता सचिन राजभोज यांनी अरेरावी केल्याच्या निषेधार्थ शहरवासीयांच्या वतीने सोमवारी (दि.11) मुक मोर्चा काढण्यात आला.

यावेळी आ. निलेश लंके यांच्या सह तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांना निवेदन देण्यात आले आहे. या मुकमोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, डॉ. बाळासाहेब कावरे उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर, योगेश मते, विद्या कावरे, नीता औटी, हिमानी नगरे, नितीन अडसूळ, श्रीकांत चौरे, भुषण शेलार, आशोक चेडे, सुप्रिया शिंदे, प्रियंका औटी, नंदकुमार औटी, बंडू गायकवाड, बाळासाहेब नगरे, विजय भास्करराव औटी, डॉ.सचिन औटी, अ‍ॅड. मंगेश औटी, अक्षय चेडे, डॉ. मुदसर सय्यद, बबन चौरे, विजय डोळ, उमा बोरुडे, मयुरी औटी, दिपाली औटी, नानी बोरुडे, सिमा आवारी यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, पारनेर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजय औटी यांनी पारनेरच्या पाणी मोटारपंपा संदर्भात पाणी पुरवठा अभियंता सचिन राजभोज यांना जाब विचारला असता, राजभोज यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यात भ्रष्टाचार झाले असे सिद्ध होण्याची शक्यता असल्याने राजभोज यांनी अरेरावीची भाषा वापरली आहे. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना सदर घोटाळ्यासंदर्भात जाब विचारण्याचा अधिकार असतानाही अतिशय खालच्या दर्जाचे वक्तव्य राजभोज यांनी केले.

नगराध्यक्षांना अशोभनीय भाषा वापरून भारतीय संविधानाचा अपमान करत आपल्या भ्रष्ट कामगिरीवर पांघरूण घालण्याचे काम केले. पारनेरच्या विकास कार्यात अडथळा निर्माण इतर कर्मचार्‍यांनाही वेठीस धरून दादागिरी करणार्‍या व या मग्रूर अधिकार्‍यावर कायदेशीर कारवाई होऊन पारनेर नगरपंचायतीचे कामकाज पूर्ववत गतिमान करावे. सदर अभियंत्यावर कायदेशीर कारवाई करत नवीन अभियंत्याची नेमणूक करावी असे यात सर्व नगरसेवक व शहरवासीयांकडून नमुद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.