पारनेर नगरपंचायत : 13 जागांसाठी झाले ‘एवढे’ टक्के मतदान

पारनेर नगरपंचायत : 13 जागांसाठी झाले ‘एवढे’ टक्के मतदान

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

मंगळवारी पारनेर नगर पंचायतीच्या (Parner Nagar Panchayat) 13 जागांसाठी शांततेत 86.09 टक्के पेक्षा जास्त मतदान (Voting) झाले. 13 प्रभागातील 8992 मतदारा पैकी 7742 मदारांनी (Voting) आपला मतदानाचा हक्क बजावला.

पारनेर नगरपंचायतीच्या (Parner Nagar Panchayat) दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Election) मंगळवारी शांततेत मतदान (Voting) झाले. एकुण सतरा प्रभाग असलेल्या नगर पंचायतीत ओ.बी.सी आरक्षणाच्या (OBC Reservation) घोळामुळे चार प्रभागातील मतदान पुढे ढकलले (Voting Postponed) असुन मंगळवारी 13 प्रभागांसाठी शांततेत मतदान झाले. मंगळवारी तेरा जागांसाठी मतदान होऊन 63 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंञात बंद झाले तर बाकी चार जागांसाठी जानेवारी महिन्यात मतदान होणार असुन त्यानंतर 19 जानेवारी 2021 रोजी सर्व जागाची एकत्रित मतमोजणी (Counting of Votes) होणार आहे. अशी माहिती निवडणूक अधिकार्‍यांनी दिली.

सतरा प्रभागांपैकी 13 प्रभागात शांततेत मतदान झाले असुन यात कुठेही कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. किंवा कुठेही मशीन बंद पडणे किंवा मतदाराची पळवापळवी असे काही प्रकार घडले नाही. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. तर निवडणूक प्रक्रिया शांततेत व खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक विभाग व महसुल विभागणी दोनशे पेक्षा जास्त कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. ही संपुर्ण निवडणूक प्रक्रिया उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले पहात होते. तर त्यांना तहसिलदार अवळकंठे व मुख्य कार्यकारी आधिकारी कुमावत यांनी सहकार्य केले.

प्रभागनिहाय मतदान असे-

प्रभाग क्र. 1 - 637

प्रभाग क्र. 2 - मतदान नाही

प्रभाग क्र. 3 - 904

प्रभाग क्र. 4 - 738

प्रभाग क्र. 5 - 430

प्रभाग क्र. 6 - 643

प्रभाग क्र. 7 - 428

प्रभाग क्र. 8 - 482

प्रभाग क्र. 9 - 751

प्रभाग क्र. 10 - 636

प्रभाग क्र. 11 - मतदान नाही

प्रभाग क्र. 12 - 370

प्रभाग क्र. 13 - मतदान नाही

प्रभाग क्र. 14 - मतदान नाही

प्रभाग क्र. 15 - 579

प्रभाग क्र. 16 - 655

प्रभाग क्र. 17 - 489

एकूण - 7742

Related Stories

No stories found.