पारनेर नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी १८ उमेदवारांचे अर्ज दाखल

पारनेर नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी १८ उमेदवारांचे अर्ज दाखल
पारनेर नगरपंचायत

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर नगरपंचायतीच्या (Parner Nagar Panchayat) प्रभाग २, ११, १३ व १४ या प्रभागांच्या निवडणूकीसाठी (Election) सोमवारी (दि. ३) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर १८ उमेदवारांनी अर्ज (Candidate Application) दाखल केले. सोमवारी सकाळपासूनच विविध उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू केली होती. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) तसेच शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी एकत्रीत जात निवडणूक निर्णय
अधिकारी सुधाकर भोसले तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांच्याकडे
अर्ज दाखल केले.

विविध प्रभागात दाखल करण्यात आलेले अर्ज पुढील प्रमाणे :

* प्रभाग २

स्वाती नीलेश खोडदे (शिवसेना), उषा अर्जुन व्यवहारे (शहर विकास आघाडी), सुप्रिया सुभाष शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)

* प्रभाग ११

सुहास लहुराव रेपाळे (अपक्ष), विलास तुकाराम मते (अपक्ष), अशोक फुलाजी चेडे (अपक्ष), हसन अमीर राजे (अपक्ष), सागर अशोक चेडे (अपक्ष), उमेश माणिकराव औटी (शिवसेना), राजू बशिर शेख (अपक्ष), विजय बाबूराव डोळ (राष्ट्रवादी काँग्रेस), अशोक फुलाजी चेडे (भाजपा)

* प्रभाग १३

विपुल संजय औटी (अपक्ष), विशाल अर्जुनराव शिंदे (शहर विकास आघाडी), ज्ञानेश्वर बाळासाहेब औटी (शिवसेना), कल्पनाताई अर्जुनराव शिंदे (अपक्ष), विजय सदाशिव औटी (राष्ट्रवादी काँग्रेस)

* प्रभाग १४

निता देवराम ठुबे (शिवसेना), मयुरी नंदकुमार औटी (राष्ट्रवादी काँग्रेस).

Related Stories

No stories found.