पारनेर नगरपंचायतीत दोन प्रभाग महिला राखीव, दोन खुले

ओबीसी रिक्त जागेबाबत आज झालेल्या सोडतीतून स्पष्ट
पारनेर नगरपंचायतीत दोन प्रभाग महिला राखीव, दोन खुले

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर नगरपंचायतीच्या ओ.बी,सी आरंक्षणाच्या गोधळात रिक्त राहिलेल्या चार जागासाठी गुरुवारी नव्याने सोडत काढण्यात आली. या सोडतीत ओबीसी आरक्षीत प्रभाग 2 व 14 मध्ये सर्वसाधरण महिला तर प्रभाग 11 व 13 मध्ये सर्वसाधारण पुरूष आरक्षण आले आहे.

सतरा जागा आसलेल्या पारनेर नगर पंचायतीत नुकतेच 13 जागासाठी मतदान झाले. तर न्यायालय प्रक्रियेमुळे चार प्रभागातील निवडणूक आयोगाने थांबवली होती. नुकताच न्यायालयाने आदेश देत राहिलेल्या जागासाठी मतदान घेण्याचे आदेश दिले व नवीन मतदान होईपर्यंत पुर्वीची मतमोजनी थांबवली होती. त्यासाठी गुरुवारी राहिलेल्या चार जागासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात सर्वसाधारण दोन पुरूष व दोन महिलांचे आरक्षण निश्चित झाले आहे. आता 18 जानेवारी 2022 रोजी या जागांसाठी मतदान होणार असुन 19 जानेवारी 2022 ला सर्व सतरा प्रभागाची मत मोजणी एकाच वेळी होणार आहे.

पहिल्या टप्प्यात 86 % टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाले होते. तर आता राहिलेल्या जागासाठी किती मतदान होते याकडे सर्वाचे लक्ष्य लागले आहे. राजकीय नेतेही पहिल्या टप्यातील नुकसान भरुन काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. राहिलेल्या चार जागाची सोडात जाहिर झाल्याने पुन्हा एक महिनाभर पारनेर शहरातील वातावरण गरमागरम राहणार हे नक्की.

आरक्षण पुढीलप्रमाणे -

प्रभाग क्रमांक 02 सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 11 सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 13 सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 14 सर्वसाधारण महिला

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com