पारनेर |प्रतिनिधी| parner

कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेरमध्ये रब्बी हंगाम 2020- 2021 साठी नाफेडमार्फत आधारभूत

किंमत दराने हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली.15 फेब्रुवारी 2021 पासून आधारभूत किंमत दराने हरभरा उत्पादक शेतकर्यांची नोंदणी सुरू करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

खरीप हंगाम 2020-2021 साठी हरभरा खरेदीचा हमीभाव 5 हजार 100 रुपये प्रति क्विंटल असून नोंदणीसाठी शेतकरी 7/12 व 8 अ उतारा मूळ प्रतीवर हरभरा या शेतमालाची फक्त रब्बी हंगाम 2020-2021 ची ऑनलाईन पिकपेरा नोंद आवश्यक आहे. शेतकरी नोंदणी ही समक्षपणे करण्यात येणार असून यामुळे भरण्यात येणारी सर्व माहिती बँक डिटेल्स बरोबर असल्याची खात्री करण्यात यावी.

शेतकर्यांनी शेतमाल स्वच्छ व वाळवून, कचरा, दगड, माती, दाळ विरहीत (आर्द्रता 12 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी) शेतमाल खरेदी केंद्रावर खरेदी झाल्यानंतर त्वरीत ऑनलाईन काटा पट्टी घेण्यात यावी, या खरेदी योजनेमध्ये केवळ ऑनलाईन काटापट्टी ग्राह्य आहे. खरेदी नोंदणी करताना चालू बँक खात्याची माहिती बिनचूक व स्पष्ट दिसेल अशी देण्यात यावी.

बाजार समितीस हरभरा खरेदी केंद्र मिळून हरभरा शेतकर्यांना हमीभाव मिळवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पणनमंत्री बाळासाहेब पाटील, तसेच मार्केटींग फेडरेशनचे एम.डी. तेलंग पाटील व जिल्हा मार्केटींग अधिकारी नगर यांनी सहकार्य केले. तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकर्यांनी या खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे उपसभापती व संचालक मंडळाने केले आहे.