पारनेर तालुक्यात खरीपासाठी 78 हजार 400 हेक्टर क्षेत्र

पारनेर तालुक्यात खरीपासाठी 78 हजार 400 हेक्टर क्षेत्र

सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर तालुका कृषी विभाग आगामी खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. खरीपातील विविध पिकासाठी बियाणे, खते, औषधे यांची मागणी नोंदवून हंगामाच्या पूर्व तयारीला सुरूवात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तालुक्यात खरीप हंगामासाठी 78 हजार 400 हेक्टर क्षेत्र असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

पारनेर क्षेत्रफळाने मोठा आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुध व कुकुट पालनही तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्याची शेती सिंचनासोबतच पावसावर अवलंबून आहे. या ठिकाणी खरीप, रब्बी हंगामाबरोबरच काही क्षेत्र बारामाही बागायती आहे. साधारणपणे जून महिन्यांत खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरूवात होते. याबाबत तालुका कृषी आधिकारी गायकवाड यांनी अधिक माहिती देताना सांगितले, तालुक्यात खरीप हंगामासाठी 78 हजार 400 हेक्टर क्षेत्र वहिलाताखाली असून यात मूग पिकासाठी 23 हजार हेक्टर, तूर 2 हजार 700 हेक्टर, मका 2 हजार 400, बाजरी 21 हजार हेक्टर, उडीद 600 हेक्टर क्षेत्र आहे.

तसेच भूईमुग 4 हजार 500 हेक्टर, सोयाबीन तीन हजार 250 हेक्टर असून तालुक्यात ऊस 4 हजार हेक्टर व कांदा 4 हजार 500 हेक्टरवर घेण्यात येतो. खरीप हंगामासाठी कृषी विभागणी तालुक्यासाठी 25 हजार 978 मेट्रीक टन खताची मागणी केली असून 21 हजार 505 मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. तालुक्यात 5 हजार 488 मेट्रीक टन खत शिल्लक असल्याची माहिती कृषी अधिकारी गायकवाड यांनी दिली. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती तालुक्यातील शेतकर्‍यांना वेळोवेळी मदत व मार्गदर्शन करत असते. तसेच पावसाअभावी पिके जळणे अथवा अतिवृष्टी गारपिटीने नुकसान झाल्यावर बाजार समितीच्या माध्यमातून शासन दरबारी नुकसान भरपाईसाठी पाठपुरावाही केला जातो, अशी मााहिती पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली.

यापूर्वी कृषी सेवा केंद्र चालकांकडून युरियासोबतच अन्य खत घेण्याचा आग्रह केला जात होता. अन्य काही दुकानदार खतांची बियाणे याची कृतीम टंचाई दाखवूननंतर चढ्या दराने विक्री करत असल्याचे प्रकार घडलेले आहेत. कृषी केंद्र चालकांनी असा प्रकार केल्या, सदोष बियबाणे विक्री केल्याचे आढळून आल्यास त्याकृषी केंद्रावर दंडात्म कारवाईसह परवाना निलंबित करण्याचा इशारा कृषी केंद्र चालकांनी दिला आहे. यामुळे खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांसोबतच तालुका कृषी विभाग सज्ज झाल्याचे दिसत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com