सुपारी घेऊनच चित्रा वाघ यांनी केली तहसीलदार देवरेंची पाठराखण

शिवप्रहार संघटनेचे भोर यांचा घणाघाती आरोप
सुपारी घेऊनच चित्रा वाघ यांनी केली तहसीलदार देवरेंची पाठराखण

पारनेर | प्रतिनिधी

एकीकडे करोना (Corona) काळात हजारो रुग्णांना शरद पवार महाकोव्हिड सेंटरच्या (Sharad Pawar Covid Center) माध्यमातून हजारो रुग्णांना मोफत उपचार जीवनदान दिले आहे. देशासह राज्यात करोना काळात उल्लेखनीय काम केले असतानाही केवळ एका भ्रष्ट अधिकार्‍याला पाठीशी घालण्यासाठी राज्यातील नेते जर पारनेरमध्ये (Parner) येत असतील तर भाजपच्या नेत्यांनी सुपारी घेतल्या असल्याचा घणाघाती आरोप शिव प्रहार संघटनेचे (Shivprahar Sanghatana) संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील (Sanjiv Bhor Patil) यांनी केला आहे.

एकीकडे राज्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असताना त्या प्रश्नावर आवाज उठवणे अपेक्षित असून भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा भ्रष्टाचाराचा ठपका असलेल्या तहसीलदार देवरे (Tehsildar Jyoti Devre) यांना समर्थन देऊन एक प्रकारे पाठीशी घातल्याचा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने पारनेर तहसीलदार देवरेंच्या भ्रष्ट व मनमानी कारभारा विरोधात आंदोलन करणारा महसूल कर्मचारी, तलाठी संघटनेचे सदस्य यांना आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला.

यावेळी भोर यांनी भ्रष्ट व मनमानी कारभार करणार्‍या वादग्रस्त तहसीलदार देवरेंवर निलंबनाची, तसेच सरकारी सेवा शर्ती भंग केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारांकडे केली आहे. आत्महत्या करण्याचा इशारा देणार्‍या देवरेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही शिवप्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी नेते अनिल देठे, संपत दरेकर, निलेश भोर, सतीश भोर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com