पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक

पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

संचारबंदीत देखील पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असून, वाळू वाहतूक करणार्या विना क्रमांकाच्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक आर्थिक हितसंबंध असल्याने जाणीवपुर्वक कारवाई करीत नसल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

तर या प्रकरणी उपलब्ध असलेल्या सीसीटिव्ही फुटेजची पहाणी करुन संबंधित वाहन निरीक्षकाची चौकशी करुन कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे.

पारनेर तालुक्यात अवैध वाळू व्यवसाय करणारे शंभर पेक्षाही जास्त वाहतूक करणारे वाहनांचे सीसीटिव्ही फुटेज उपलब्ध आहे. मात्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक यांनी अवैध वाळू व्यवसायिकांशी अर्थपूर्ण संबंध ठेवून जाणीवपूर्वक फक्त पाच वाहनांवर कारवाई दाखवली आहे.

ही कारवाई देखील माहिती अधिकारातून उघड झाली आहे. अशा अधिकार्यांच्या बेजबाबदारपणामुळे अवैध धंद्यांना पाठबळ मिळत असून, सदरच्या परिसरात वाळू तस्करांची दहशत निर्माण झाली असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com