माध्यमिक शिक्षकांना निवडणूक, बीएलओ कामकाजातून वगळा!

 शिक्षक
शिक्षक

पारनेर (तालुका प्रतिनिधी)

पारनेर तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांना अतिरिक्त कार्यभार दिल्यामुळे तसेच बीएलओ व निवडणूक ही अशैक्षणिक कामे दिल्यामुळे त्याचा परिणाम अध्यापन आणि अन्य शैक्षणिक कामावर होत आहे. यामुळे तालुका माधयमिक शिक्षक संघटनेच्यावतीने पारनेर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांना निवेदन देत ही कामे वगळण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, गेल्या काही वर्षांपासून शासनाने नोकर भरती बंदी घातल्याने माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे या रिक्त पदांचा कार्यभार इतर शिक्षकांवर पडत आहे. त्याचबरोबर माध्यमिक शाळेमध्ये अनेक स्पर्धा परीक्षांचे आयोजनही शासनामार्फत केले जाते. त्यामध्ये नवोदय प्रवेश परीक्षा, प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा एनएमएमएस परीक्षा एमटीएस परीक्षा एनटीएस परीक्षा हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा, इतिहास, भूगोल, गणित, प्रज्ञाशोध परीक्षा, ज्ञानवर्धनि स्पर्धा परीक्षा अशा विविध परीक्षांचे तसेच विज्ञान प्रदर्शन क्रीडा विभाग आदी स्तरावरून कामकाज केले जाते.

तसेच इयत्ता दहावीचा जादा तास बोर्ड परीक्षा पेपर तपासणी आदी कामांचा अतिरिक्त ताण रिक्त पदांमुळे उपलब्ध सेवकांवर पडत आहे. या सर्व परीक्षांचा कार्यभार व रिक्त पदांचा विचार करता येणार्‍या निवडणुकीच्या कामासाठी ठराविक शाळा मधूनच सर्व सेवकांची नियुक्ती न करता सर्व शाळांमधून प्रत्येकी तीन ते चार सेवकांचा सहभाग घेण्याबाबत विचार व्हावा, तसेच बीएलओ कामकाजामध्ये माध्यमिकच्या शिक्षकांना न घेता इतर प्राथमिक शिक्षकांचा तेथे विचार करण्यात यावा, बीएलओ सारख्या अशैक्षणिक कामांसाठी माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावेळी पारनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब निवडुंगे, सचिव भगवान राऊत, उपाध्यक्ष सुदाम दळवी, सचिव भगवान राऊत, शशिकांत भालेकर, सुरेश थोरात, बाबासाहेब दौंड, जयवंत पुजारी, संतोष व्यवहारे, योगेश खांडरे, संदीप शिंदे, विजय पठारे, संपत गुंड, संजय कारखिले, राजाराम शिंदे, रमेश गायकवाड, सुनील औटी, संजय खोडदे, डी.एस.ठवाळ, डी. व्ही. खोसे, आर. सी. दरेकर, आय.आय. मुळे, ए.पी.भोंडवे, मंगेश काळे, एम.एस इनामदार आदी उपस्थित होते.

माध्यमिक शिक्षकांना शैक्षणिक कामाचा ताण आहे अनेक शाळांवर अनेक वर्षापासून रिक्त जागा भरलेल्या नाहीत त्यामुळे उपलब्ध शिक्षक हे कामकाज करत आहेत त्यातच निवडणूक कामकाज व बीएलओ या जबाबदार्‍या कशा पार पाडायच्या व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे द्यायचे याबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा व माध्यमिक च्या शिक्षकांना या शैक्षणिक कामापासून दूर ठेवावे.

सुदाम दळवी, उपाध्यक्ष, तालुका माध्यमिक शिक्षक संघ.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com